⁠ 
गुरूवार, नोव्हेंबर 21, 2024
Home | जळगाव जिल्हा | चाळीसगाव | चाळीसगाव-धुळे मेमू आता दिवसातून चार वेळा धावणार, असे आहे वेळापत्रक?

चाळीसगाव-धुळे मेमू आता दिवसातून चार वेळा धावणार, असे आहे वेळापत्रक?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ एप्रिल २०२३ । चाळीसगाव-धुळे मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे ११ एप्रिल पासून चाळीसगाव-धुळे मेमू ट्रेन दिवसातून चार वेळा धावणार आहे. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सध्या लग्नसराईत सुरु आहे. सोबतच उन्हाळी सुट्ट्या लवकरच लागणार असल्याने अनेक कुटूंब रेल्वेने गावी जातात. यामुळे रेल्वेत देखील मोठी गर्दी दिसून येतेय. अशातच चाळीसगाव-धुळे मेमू दिवसातून चार वेळा धावणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

असे आहे वेळापत्रक-
चाळीसगाव येथून पहिली फेरी ६.३० वाजता, दुसरी फेरी ९.३० वाजता, तिसरी फेरी दुपारी १२.५५ वाजता, चौथी फेरी सायंकाळी ५.३० वाजत सुटणार आहे.
धुळे येथून पहिली फेरी संकाळी ७.३५ वाजता, दुसरी फेरी संकाळी ११.३० वाजता, तिसरी फेरी ३.३० वाजता, चोथी फेरी सायंकाळी ७.२० वाजता सुटणार आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.