नोटबंदीनंतर पहिल्यांदाच अर्थमंत्र्यांनी केला 2000 च्या नोटेबाबत मोठा खुलासा..
जळगाव लाईव्ह न्यूज । ६ एप्रिल २०२३ । जर तुमच्याकडेही 2000 रुपयांची नोट तर मग ही बातमी अवश्य वाचा. कारण नोटाबंदीच्या सुमारे 6 वर्षानंतर केंद्र सरकारकडून चलनी नोटांबाबत असे अपडेट आले आहे. गेल्या काही वर्षांत या नोटा खूपच कमी झाल्या आहेत. 2000 च्या नोटांबाबत रिझर्व्ह बँकेने बँकांना काही आदेश दिले आहेत का? खुद्द अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत याबाबत मोठा खुलासा केला आहे.
सध्या सर्वत्र 2000 रुपयांच्या नोटेची चर्चा पाहायला मिळत आहे. आजकाल बँकांच्या एटीएममधून 2000 रुपयांऐवजी 500 आणि 200 रुपयांच्या नोटा बाहेर येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 2000 रुपयांच्या नोटा बाजारातून काढून टाकण्याचा सरकारचा विचार आहे का? हा मुद्दा संसदेत उपस्थित करण्यात आला आहे. लोकसभेत खासदार संतोष कुमार यांनी अर्थमंत्र्यांना अनेक प्रश्न विचारले आहेत, ज्यांची उत्तरे खुद्द अर्थमंत्र्यांनीच दिली आहेत.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत खुलासा केला की आरबीआयच्या वार्षिक अहवालानुसार मार्च 2017 आणि मार्च 2022 अखेर 500 आणि 2000 रुपयांच्या नोटांचे एकूण मूल्य 9.512 लाख कोटी आणि 27.057 लाख कोटी होते.
आरबीआयने निर्देश जारी केले नाहीत
यासोबतच अर्थमंत्र्यांनी असेही सांगितले की, रिझर्व्ह बँकेने बँकांना अशा कोणत्याही सूचना दिल्या नाहीत. कोणत्या मूल्याची नोट आणि कधी टाकायची हे बँकेनेच ठरवले आहे. यासोबतच अर्थमंत्र्यांनी सांगितले की, आरबीआयच्या वार्षिक अहवालानुसार 2019-20 सालापासून 2000 रुपयांची नोट छापण्यात आलेली नाही.