⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळला : जळगाव शहरासाठी आमदार भोळेंना दिला 100 कोटींचा निधी

देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळला : जळगाव शहरासाठी आमदार भोळेंना दिला 100 कोटींचा निधी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्युज| ५ एप्रिल २०२३ | भाजप नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी जळगाव शहराच्या विकासासाठी 100 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली होती. मात्र त्यानंतर मोठा कालावधी उलटला तरी 100 कोटी पैकी एक रुपयाही जळगाव शहराला मिळाला नव्हता. यामुळे भाजपवर मोठी टीका होत होती. हा निधी मिळवण्यासाठी आमदार राजू मामा भोळे यांनी पाठपुरावा सुरू केला. जळगावच्या विकासासाठी तुम्हाला हा निधी देणारच असा शब्द फडणवीस यांनी राजू मामा यांना दिला. या शब्दाची वचनपूर्ती करत 100 कोटी रुपयांचा निधी अखेर आज मिळाला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून आमदार राजुमामा भोळे यांच्यावर विरोधकांकडून मोठ्या प्रमाणावर टीका केली जात होती. शहराच्या विकास व्हावा यासाठी तुम्ही किती निधी आणला? असा प्रश्न विरोधक नेहमीच आमदार भोळे यांना विचारत होते. मात्र तब्बल 100 कोटींचा निधी जळगाव शहरासाठी आमदार भोळे यांनी आणला असून त्यांच्या सर्व विरोधकांच्या आरोपांना एक प्रकारची विकासाची चपराक आमदार भोळे यांनी मारली आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जळगाव शहर महानगरपालिकेला तब्बल 100 कोटीचा निधी दिला होता मात्र सरकार बदलल्यावर महाविकास आघाडी सरकारकडून हा निधी कोरोना काळात पुन्हा घेण्यात आला होता. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पूर्ण केला असून जळगाव शहरासाठी आणि जळगावकरांसाठी त्यांनी तब्बल 100 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यामुळे शहराच्या एकूणच विकासाला गती मिळणार आहे.

या निधी अंतर्गत जळगाव शहरातील रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण केले जाणार आहे. यामुळे इतर वेळी आ. भोळे यांच्यावर होणारी टीका आता भोळे यांनी निधी आणून पलटवली आहे. या निधी अंतर्गत शहरातील कॉलनी परिसरातील रस्त्यांच्या कामांना सुरुवात होणार आहे. यामुळे जळगावचे रस्ते लवकरच आता चकाचक होणार यात काही वाद नाही. पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि ग्रामविकास मंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांचे निधी मिळवून देण्यासाठी मोठे सहकार्य लाभले आहे.

author avatar
Tushar Bhambare