केवळ बाजार समितीतच नाही, तर आगामी लोकसभा निवडणुकीतही युती कायम : गुलाबराव पाटील
जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मार्च २०२३ । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहून आम्ही भाजपसोबत आलो आहोत. त्यांच्यासोबत आपण कायम राहणार आहोत. त्यामुळे बाजार समित्यांच्या निवडणुकीत आपली भाजपसोबतच लढणावर आहोत. मात्र भाजप आणि शिवसेने आपल्यात दुफळी निर्माण करणात्या कार्यकर्त्यांपासून लांब राहावे असे असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
जिल्ह्यातील १२ बाजार समित्यांच्या निवडणुकासंदर्भात चर्चा करण्यासाठी शिवसेना (शिंदे गट) हॉटेल रॉयल पॅलेसमध्ये मेळावा झाला. त्या वेळी ते बोलत होते. आमदार चिमणराव पाटील, आमदार किशोर पाटील, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, जिल्हाप्रमुख नीलेश पाटील उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहून आपण भाजपसोबत आलो आहोत. त्यामुळे कोणाकडेही लक्ष न देता आम्ही त्यांच्याकडे पाहून भाजपसोबतच राहणार आहोत. केवळ बाजार समितीतच नाही, तर आगामी लोकसभा निवडणुकीतही युती कायम राहील.
आम्ही केवळ निवडणूक लढवायची म्हणून ‘युती’ करणार नाही, तर प्रत्येक उमेदवार विजयी व्हावा, यासाठी प्रयत्न करणार आहोत. जेवढी ताकद शिवसेना लावेल, तेवढीच ताकद भाजप उमेदवारांच्या विजयासाठी लावणार आहे. शिवसेनेचे सर्व आमदार यासाठी प्रयत्न करतील. ज्या ठिकाणी शिवसेनेचे आमदार नाहीत, तेथे जवळच्या तालुक्यातील आमदार लक्ष देतील.