⁠ 
गुरूवार, डिसेंबर 5, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | जळगाव जिल्ह्यातील ‘या’ प्रश्नासाठी चक्क खडसे – फडणवीस आले एकत्र

जळगाव जिल्ह्यातील ‘या’ प्रश्नासाठी चक्क खडसे – फडणवीस आले एकत्र

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मार्च २०२३ । एकेकाळी एकाच पक्षात असलेले आणि सध्या एकमेकांचे राजकीय वैरी असलेले आ. एकनाथराव खडसे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधीमंडळात एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. आ. एकनाथ खडसे कधीच फडणवीसांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत मात्र जळगाव जिल्ह्यासाठी अतिशय महत्वाच्या अश्या एका विषयासाठी दोघेही एकत्र आल्याचे पाहायला मिळाले.(khadse and fadanvis together)

भुसावळ औष्णिक विद्युतकेंद्रातून निर्माण होणारी राख ही १५ किमी परिसरातील लोकांना मोफत दिली जात होती. आता शासनाने टेंडर पद्धत काढली असल्याने ती राख विकत घ्यावी लागत आहे. पूर्वी निर्णय घेतला होता त्याप्रमाणे त्या नागरिकांना ती राख मोफत देणार आहात का? तसेच बाहेर पडणाऱ्या राखेच्या विक्रीसाठी राबविल्या जाणाऱ्या टेंडर पद्धतीत अनेक गैरव्यवहार होतांना दिसत आहेत. शासन त्यावर कारवाई करणार आहे काय? याशिवाय राखेचा बंड बांधला आहे, त्यासंदर्भात केलेल्या तक्रारीवर कारवाई करणार आहात काय? असे प्रश्न आ. एकनाथराव खडसे यांनी विधान परिषदेत विचारले. यावेळी यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. (khadse and fadanvis together )

उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, प्रकल्पग्रस्त नागरिकांना जर त्या ठिकाणी कोणताही उद्योग करायचा असेल तर नक्कीच सवलतीच्या दरात ती राख देण्यात येईल. मात्र जर विकण्यासाठी म्हणजेच ट्रेडिंगसाठी जर या राखेचा उपयोग केला जात असेल तर ती देता येणार नाही. याचबरोबर जर या ठिकाणी कोणताही गैरव्यवहार होत असेल तर त्याची कागदपत्रे द्या त्याची लगेच चौकशी करण्यात येईल व जिथे जिथे राखेचे बॉण्ड आहेत आणि याचा नागरिकांच्या त्रास होत असेल तर त्याचा स्ट्रक्चरल ऑडिट केलं जाईल.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह