रविवारीही बँका सुरु ठेवा, RBI चे बँकांना महत्वाचे आदेश ; ‘हे’ आहेत त्यामागील कारण?
जळगाव लाईव्ह न्यूज । २३ मार्च २०२३ । आर्थिक वर्ष २०२२-२३ या महिन्याच्या ३१ तारखेला संपणार आहे. त्यामुळे सरकारी कार्यालये तसेच बँकांच्या महत्वाच्या कामकाजांची तयारी सुद्धा अंतिम टप्प्यात आली आहे. याच दरम्यान, देशातील सर्व बँकांसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेकडून मोठा आदेश जारी करण्यात आला. देशातील सर्व बँका 31 तारखेपर्यंत सुरु ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. आरबीआयने (RBI) यासंदर्भातील परिपत्रक देखील काढले आहे.
मध्यवर्ती बँकेच्या पत्रात म्हटले आहे की सर्व एजन्सी बँकांनी त्यांच्या नियुक्त शाखा ३१ मार्च २०२३ रोजी सामान्य कामकाजाच्या वेळेत सरकारी व्यवहारांशी संबंधित काउंटर व्यवहारांसाठी खुल्या ठेवाव्यात. त्यात पुढे म्हटले आहे की, नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (NEFT) आणि रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट (RTGS) प्रणालीद्वारे 31 मार्च 2023 च्या मध्यरात्री 12 पर्यंत व्यवहार सुरू राहतील.
यासोबतच 31 मार्च रोजी सरकारी धनादेश जमा करण्यासाठी विशेष क्लिअरिंगचे आयोजन केले जाईल, ज्यासाठी RBI चे डिपार्टमेंट ऑफ पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम (DPSS) आवश्यक निर्देश जारी करेल. RBI ने आपल्या निर्देशात म्हटले आहे की 31 मार्चची रिपोर्टिंग विंडो 1 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत RBI ला GST किंवा TIN 2.0 e-receipts लगेज फाइल अपलोड करण्यासह केंद्र आणि राज्य सरकारच्या व्यवहारांच्या अहवालासंदर्भात उघडी ठेवली जाईल.