⁠ 
रविवार, मे 19, 2024

जळगाव बाजार समिती निवडणुकीत महाजनांची कोंडी करण्याचा प्लॅन ठरला !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज : २३ मार्च २०२३ :  जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील निवडणुकांमध्ये दोन वेळा सपाटून मार खाल्यावर महाविकास आघाडी म्हणजेच काँग्रेस , राष्ट्रवादी आणि शिवसेना (ठाकरे गट) आता बाजार समितीच्या निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत. भाजपची पर्यायी गिरीश महाजनांची कोंडी करण्याचा प्लॅन महाविकास आघाडीने आखला आहे. यामुळे आता होणारी जळगाव बाजार समितीची निवडणूक चांगलीच रंगदार होणार आहे. (jalgaon bajar samiti election 2023)

जळगाव बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतर्फे पॅनल उभे करण्याचा निर्णय नुकताच जाहीर करण्यात आला. माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला. बुधवारी मजूर फेडरेशनच्या कार्यालयात बैठक झाली. यात हा निर्णय घेण्यात आला. (girish mahajan vs mahavikas aghadi)

या बैठकीला ठाकरे गटाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, ठाकरे गटाचे विरोधी पक्षनेते सुनील महाजन, जिल्हा बँकेचे संचालक श्यामकांत सोनवणे, लक्ष्मण पाटील, वाल्मीक पाटील, नीलेश चौधरी, काँग्रेसचे बेनहर टेलर, माजी नगरसेवक मनोज चौधरी, लीलाधर तायडे यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते.

मजूर फेडरेशन येथे झालेल्या या बैठकीनंतर महाविकास आघाडीच्या जिल्ह्यातील नेत्यांच्या विस्तृत बैठका घेण्यात येणार आहेत. त्यानंतर पॅनल निश्चित करण्यात येणार आहे.महाविकास आघाडीसाठी हि निवडणूक अतिशय महत्वाची असल्यामुळे पुढे काय होते ? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. (result of bajar samiti election 2023 jalgaon )