⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | रावेर | अवकाळीमुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची खा. खडसेंनी केली पाहणी

अवकाळीमुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची खा. खडसेंनी केली पाहणी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | २२ मार्च २०२३ | शुक्रवारी रात्री रावेर तालुक्यात जोरदार पाऊस झाला. या अवकाळी पाऊस व जरदार वाऱ्यामुळे रावेर तालुक्यातील खिर्डी शिवार, धामोडी शिवार, भांबलवडी शिवार, वाघाडी शिवार, रेंभोटा शिवार, निंबोल शिवार ई. ठिकाणी पिकांची मोठ्या प्रमाणवर हानी झाली शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान झाले.

अश्यावेळी खासदार रक्षा खडसे यांनी नुकसानग्रस्त भागाची स्थानिक भाजपा पदाधिकारी व महसूल व कृषी अधिकाऱ्यांसह पाहणी करून नुकसानी बाबत माहिती घेतली. तसेच तत्काळ पंचनामे करणे बाबत संबंधितांना निर्देश देऊन, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धिर दिला व लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आपल्या परीने पुरेपूर प्रयत्न करणार याबाबत आश्वासन दिले.

यावेळी माझ्यासह भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, भाजयुमो जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, तालुकाध्यक्ष राजन लासूरकर, सुनिल पाटील, तालुका सरचिटणीस महेश चौधरी, रामदास पाटील, भाजयुमो सरचिटणीस शुभम पाटील, रवींद्र पाटील, नितीन पाटील, सोनू पाटील, भूषण पाटील, जयचंद पाटील, लखन पाटील, दुर्गेश पाटील, गोरख पाटील, रामचंद्र पाटील, किरण नेमाडे, अतुल पाटील, खिर्डी मंडळ अधिकारी मीना तडवी, महसूल नायब तहसीलदार मयूर कळसे, तलाठी निलेश पाटील इ. उपस्थित होते.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह