⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | चाळीसगाव | मोठी बातमी : जळगाव चाळीसगाव रस्ता होणार चकाचक

मोठी बातमी : जळगाव चाळीसगाव रस्ता होणार चकाचक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज : १५ मार्च २०२३ : गेल्या अनेक वर्षांपासून दुरावस्थेत असलेल्या जळगाव – चाळीसगाव राष्ट्रीय महामार्ग क्र.753 रस्ता आता चकाचक होणार आहे. कारण या रस्त्याचा वनवास संपला असून रस्त्यासाठी तब्बल साडे नऊ कोटींचा निधी मंजुर करण्यात आला आहे.

खासदार उन्मेशदादा पाटील यांच्याकडे सात्यत्याने येथून प्रवास करणारे प्रवासी तक्रार करत होते. यातच अखेर खासदार उन्मेश पाटील यांच्या प्रयत्नातून या महामार्गावरील सुमारे 12 किलोमीटर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 9 कोटी विस लाखांचा निधी मंजूर झाला आहे.

पर्यायी या रस्त्याचा वनवास संपला आहे. या निधीसाठी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या माध्यमातुन तातडीने निधी मंजूर करण्यात आला आहे. लागलीच या महामार्गाची दुरुस्तीला प्रारंभ होणार असून प्रवाश्यांचे होणारे हाल थांबून अपघात कमी होवून वाहनधारकांना दिलासा मिळणार असल्याची माहिती खासदार उन्मेश पाटील यांनी नवी दिल्ली येथून दिली आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह