प्रेयसीने दिलेले घड्याळ फोडले म्हणून पत्नीच्या डोक्यात मारला लोखंडी रॉड
जळगाव लाईव्ह न्यूज : १४ मार्च २०२३ : विवाहबाह्य संबंध असलेल्या महिलेने पतीला घड्याळ दिल्यानंतर ते संतापात पत्नीने फोडल्याच्या वादातून संतप्त पतीने पत्नीला मारहाण करीत तिच्या डोक्यात लोखंडी रॉड मारला. या प्रकरणी पतीविरोधात रविवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पतीविरोधात गुन्हा दाखल
जळगावातील 26 वर्षीय विवाहितेने एमआयडीसी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे पती राहुल यांना विवाहबाह्य संबंध असलेल्या एका महिलेने घड्याळ दिले होते व ते तक्रारदाराने फोडल्यानंतर त्याचा पतीला राग आला व त्यांनी चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली तसेच डोक्यात लोखंडी रॉड मारला. ही घटना शनिवार, 11 मार्च रोजी सायंकाळी घडली. जखमी झालेल्या विवाहितेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून आरोपी पती राहुल विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार अशोक पवार करीत आहे.