‘या’ दिवशी खरेदी करा मोटो जी73 (5G) अन् मिळवा दोन हजार रुपयांची सूट
जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मार्च २०२३ । मोबाईल फोन ही रोजच्या जगण्यातली अत्यंत आवश्यक आणि गरजेची गोष्ट आहे. एखादा दिवस जरी फोन नसेल तरी चुकल्या चुकल्यासारखं होत. ग्राहकांची हिच गरज ओळखून मोबाईल कंपन्या देखील आपल्या फोनमध्ये सातत्याने बदल करत असतात. जास्तीतजास्त युझर फ्रेंडली फोन करण्याकडे कंपन्यांचा कल असतो.
गेला काही काळ मोबाईलचे हे मार्केट सॅमसंग, वन प्लस अशाच काही कंपन्यांनी व्यापलेलं होत. या गर्दीत पूर्वापार लोकप्रिय असलेल्या मोटोरोला, नोकिया या कंपन्या काहीशा मागे पडलेल्या दिसत होत्या. आता पुन्हा एकदा मोटोरोलाने जोरदार कमबॅक केले असून नुकताच त्यांचा मोटो जी ७३ (५जी) फोन बाजारात आला आहे. या फोनची विक्री लवकरच भारत सुरू होणार आहे. त्याचीच माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
मोटोरोलाने काही दिवसांपूर्वी अधिकृतपणे आपला जी सीरीज मोटो जी७३ ५जी स्मार्टफोन भारतात लॉन्च केला होता. या फोनची पहिली विक्री १६ मार्चपासून सुरू होणार आहे. जर तुम्ही मोटो जी७३ ५जी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. १६ मार्चपासून सुरू होणाऱ्या पहिल्या सेलमध्ये या फोनवर तब्बल दोन हजार रुपयांची बंपर सूट मिळणार आहे. या फोनमध्ये मीडिया टेक चिपसेट, १२०Hz डिस्प्ले, अँड्रॉइड १३ आणि ५०००mAh बॅटरी आहे.
दोन रंगांमध्ये उपलब्ध
तुम्हाला फोन घ्यायचा असेल तर मोटोरोला फोन फ्लिपकार्टवरून खरेदी करता येईल. ८GB रॅम + १२८GB स्पेसिफिकेशन असलेल्या फोनची किंमत १८,९९९ रुपये आहे. हा फोन मिडनाईट ब्लू आणि ल्युसेंट व्हाइट या दोन रंगांमध्ये उपलब्ध असेल.
मोटो जी७३ ५जी वर सूट
मोटोरोलाच्या या फोनची किंमत १८ हजार ९९९ रुपये आहे. दोन हजार रुपयांच्या सवलत मूल्यासह १६ हजार ९९९ रुपयांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. फ्लिपकार्टसह मोटोरोलाचे अधिकृत संकेतस्थळ तसेच देशभरातील आघाडीच्या रिटेल स्टोअरमध्ये खरेदीसाठी हा फोन उपलब्ध असेल. याशिवाय ज्यांच्याकडे ऍक्सिस, एचडीएफसी, आयसीआयसीआय आणि एसबीआय बँक कार्ड आहेत ते यावरील अतिरिक्त सवलतीचा लाभ घेऊ शकतात. जर तुमचं एवढं बजेट नसेल तर फोन तीन हजार रुपयांच्या मासिक हप्त्यावरही घेता येणे शक्य आहे.
मोटो जी७३ ५जी चे फीचर्स
मोटो जी७३ ५जी फोनचे फीचर्स देखील युझर फ्रेंडली आहेत. हा फोन मीडिया टेक डायमेन्सिटी ९३० एसओसी चिपसेटने सुसज्ज आहे. ८GB रॅमसह १२८GB अंतर्गत स्टोअरेजसह हा फोन उपलब्ध आहे. मेमरी कार्डसह हे स्टोअरेज १ TB पर्यंत वाढवता येईल. या फोनची स्क्रीन ६.५ इंचाचा आहे. तसेच याला एलसीडी पॅनेल आहे. या हँडसेटमध्ये ३०W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० mAh बॅटरी आहे.
मोटो जी७३ ५जी ची वैशिष्ट्ये
या फोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. यात ८ MP अल्ट्रावाइड लेन्ससह ५० MP मुख्य कॅमेरा आहे. फोनच्या फ्रंट डिस्प्लेमध्ये १६ MP सेल्फी कॅमेरा आहे. याशिवाय यात डॉल्बी ऍटमॉस ऑडिओ आणि ३.५ मिमी हेडफोन जॅकसह ड्युअल-स्टिरीओ स्पीकर आहेत. मोटोरोलाचे फोन वजनाला हलके असतात, असं नेहमीच म्हटलं जातं. या फोनचे वजन १८१ ग्रॅम आहे तर रुंदी ८.२९ मिमी आहे. हँडसेटमध्ये प्लॅस्टिक बॉडीसह वॉटर-रेपेलेंट डिझाइन आहे.