---Advertisement---

दुर्दैवी : राज्यात अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका जळगाव जिल्ह्याला

---Advertisement---

farmer 1 jpg webp

जळगाव लाईव्ह न्यूज : १२ मार्च २०२३ : राज्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे सुमारे ३८ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. तसेच हवामान विभागाने पुढील आठवड्यात अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. यामुळे नुकसानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे

---Advertisement---

कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक अंदाजानुसार विविध जिल्ह्यातील ३८ हजार ६६४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट आहे. यात जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, धरणगाव, एरंडोल, चोपडा, यावल, रावेर, जामनेर, चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, मुक्ताईनगर व बोदवड या तालुक्यांना मोठा फटका बसला आहे. गहू, मका, हरभरा, ज्वारी, केळी व लिंबू पिकांचे नुकसान झाले आहे. जवळपास ८ हजार १६६ हेक्टरचा यात समावेश आहे.

याचबरोबर धुळे जिल्ह्यातील धुळे, साक्री, शिंदखेडा व शिरपूर तालुक्यामध्ये मोठा नुकसान झाल्याचे पाहिला मिळत आहे. संभाजीनगर जिल्ह्यात संभाजीनगर, पैठण, गंगापूर, खुलताबाद या तालुक्यांमध्ये मोठ नुकसान झाल्याचे पाहिला मिळत आहे. नगर जिल्ह्यात नेवासा, अकोले व कोपरगाव तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात मका, गहू, कांदा, द्राक्ष व भाजीपाला पिकाचे मोठे नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे.

याचबरोबर येते आठवड्यात हवामान विभागाने पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाज दर्शविल्याने येत्या काळात शेतकऱ्यांचे अजून नुकसान होऊ शकते अशा वेळी शेतकऱ्यांनी पिकाची काळजी घेणे अतिशय आवश्यक आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---