---Advertisement---
विशेष जळगाव जिल्हा महाराष्ट्र मुक्ताईनगर राजकारण

खडसे इज बॅक : राष्ट्रवादीने सोपवली मोठी जबाबदारी

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज : १० मार्च २०२३ : नशिबाचे फासे हे कधी, केव्हा आणि कसे फिरतील, याचा काही भरवसा नाही. मात्र, ते जेव्हा फिरतात, तेव्हा मात्र आयुष्य बदलून टाकतात. याचा अनुभव महाराष्ट्रातील एकेकाळचे हेवीवेट नेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी घेतला आहे. एकेकाळी भाजपात नितीन गडकरी, स्व. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर हुकमी एक्का म्हणून खडसेंची ख्याती होती. २०१४च्या विधानसभा निवडणुकीनंतर खडसे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते.

khadse jpg webp webp

मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर देखील त्यांची मर्जी सांभाळण्यासाठी त्यांना महसूलसह तब्बल आठ खात्यांच्या कारभार देवून खूश करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याआधी ते विधानसभेत विरोधीपक्ष नेते व विधीमंडळ गटनेते देखील होते. अभ्यासू आमदार म्हणून अनेक वर्ष काम केल्यानंतर त्यांना सर्वप्रथम गटनेते पदाची जबाबदारी देण्यात आली होती. आता पुन्हा एकदा खडसेंना गटनेते पदाची जबाबदारी देण्यात आली. फरक एवढा आहे की यंदा त्यांना राष्ट्रवादीने त्यांना ही जबाबदारी दिली आहे व ती विधानपरिषदेत आहे.

---Advertisement---

राष्ट्रवादीने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. राष्ट्रवादी कॉग्रेसच्या परिषदेतील गटनेतेपदी खडसेंची निवड करण्यात आली आहे. तर राष्ट्रवादीच्या प्रतोतपदी अनिकेत तटकरेंची निवड करण्यात आली. राष्ट्रवादीकडून विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोर्‍हे यांना याबाबतचे पत्रही देण्यात आले होते. एकनाथ खडसे यांच्याकडे अनेक वर्षाचा सभागृहातील कामकाजाचा अनुभव असल्याने त्यांना गटनेतेपदाची जबाबदारी सोपवण्यात आले आहे.

खडसेंच्या माध्यमातून जळगावमध्ये राष्ट्रवादीला अधिक बळ मिळेल आणि आगामी निवडणुकीमध्ये याचा फायदा होईल असे पक्षाचे राजकीय गणित असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. खडसे राष्ट्रवादीत आल्यानंतर ते विधानपरिषदेवर आमदार झाले. त्यानंतर आता त्यांच्यावर राष्ट्रवादीने मोठी जबाबदारी दिली आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---