जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मार्च २०२३ । आज जगभरात जागतिक महिला दिन (womens day) साजरा केला जात असून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये एकही महिला मंत्री नसल्याने विराेधक सत्ताधा-यांना खिंडीत पकडत आहेत. याबाबत सत्ताधारी मंत्र्यांना विचारले असता क्रीडा भाजपचे मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan)यांनी मोठं व्यक्तव्य केलं आहे.
नेमकं काय म्हणाले महाजन?
गिरीश महाजन म्हणाले मंत्रिमंडळ विस्तार लवकर होण्याची शक्यता असून यात महिला सदस्यांना मंत्रिमंडळात संधी मिळू शकेल. मंत्रिमंडळ विस्ताराला उशीर होत असल्याने ते होऊ शकलं नाही.सगळे मार्ग सुकर झाले आहेत. विस्तार होईल त्यावेळेला सगळा बॅकलॉग भरून काढला जाईल असे मत क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांनी नवी मुंबईत व्यक्त केले.
संजय राऊतांवर टोला
दरम्यान, यावेळी मंत्री महाजन यांनी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊतांवर टोला लगावला आहे. संजय राऊतांबद्दल रोज रोज बोलायला आमच्याकडे शब्द नाहीत. ते रोज भांग मध्ये बोलतात की आणखी कुठला नशा करतात हे आम्हाला माहित नाही. ते कोणत्या नशेत बोलतात हाच खरा संशोधनाचा विषय आहे अशी टिप्पणी मंत्री गिरीश महाजन यांनी केली.
ते काहीही शिवीगाळ करू शकतात कोणालाही काही बोलू शकतात. ते स्वयंभू आहेत. त्यांना आम्ही मोकळा सोडले त्यांना रोज रोज उत्तर कोण देईल ते ज्या भाषेत बोलतात त्या भाषेत बोलणं आमची संस्कृती नाही असेही महाजन यांनी स्पष्ट केले