जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मे २०२१ । आज 12 मे रोजी विश्वपरिचारिका दिना निम्मित पाचोरा शहरातील शासकीय ग्रामीण रुग्णालयावतील परिचारिकाचा सन्मान करण्यात आला. सध्याच्या परिस्थिती आणि आरोग्य विभागाची मेहनत आणि रुग्णाला आपला समजून त्याची सेवा करणाऱ्या परिचारिका गेल्या दोन वर्षांपासून रुग्णाची निःस्वार्थ सेवा करत आहे तसेच. घरचे काम करून ही परिचारिका आपली सेवा तत्परतरणे देत आहे सलाम आहे याच्या कर्तृत्वला.
याचा झाला सन्मान–
परिचारिका -भारती पाटील, जिजा वाडेकर, वनिता जाधव, दीपाली भावसार, भिलाबाई ढोले, अश्विनी जगताप, जोत्स्ना पाटील.नैना वाघ,दुर्गा तेली,वैशाली,आकाश ठाकूर याचा सन्मान शिवसेनेचे किशोर बारवकर, पाचोरा शासकीय रुग्णालय अधिक्षक अमित साळूंखे, राष्ट्रवादी काँग्रेस विकास पाटील याच्या तर्फे करण्यात आला.
सन्मान मिळाल्यावर परिचारिका भारती पाटील व इतर परिचारिकांनी ह्या सन्मानासाठी सर्वाना धन्यवाद दिला आणिसांगितले सेवा करत असताना नेहमी इच्छा असते की ज्याची सेवा करत आहे तो रुग्ण बरा होऊन लवकर आंनदी घरी आपल्या परिवाजवळ जावा पण सध्याच्या परिस्थितीत अनेक रुग्ण दगावले मनाला असह्य वेदना झाल्या. पण वाईट वेळ आहे निघून जाईल सर्व जनतेला आजच्या दिवशी आव्हान केले आहे की मास्क घाला, स्वतःची घरच्यांची सुरक्षा घ्या लस जरूर घ्या.