जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मार्च २०२३ । अलीकडेच घरफोडीसह वाहन चोरीला जाणाऱ्या घटनांना प्रचंड वाढल्या आहेत. त्यात जनावरे देखील चोरीस जात असल्याच्या घटना समोर आले आहे. अशातच चोरी केलेल्या बकर्यांची विक्री करणार्यासाठी एमआयडीसीतील गुरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या दोन महिलांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केलीय. उषा पांडुरंग काटे (वय-५०) व सपना रविंद्र गोंधळी (वय-३२, दोघ रा. शिरसोली ता. जळगाव) असे अटक केलेल्या महिलांची नावे आहेत.
नेमकी काय आहे घटना?
शहरातील एमआयडीसी परिसरात भरणार्या गुरांच्या बाजारात चोरी केलेल्या बकर्यांची विक्री करण्यासाठी दोन महिला आल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोहेकॉ अल्ताफ पठाण यांना मिळाली. त्यांनी ही माहिती पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना दिली. पोकॉ विशाल कोळी यांच्यासह दोन महिला पोलीसांना सोबत घेवून पठाण हे गुरांच्या बाजारात गेले असता, त्यांना याठिकाणी दोन महिला ६ बकर्या घेवून उभ्या दिसल्या.
त्यांनी बकर्यांबाबत त्यांच्याकडे विचापूस केली असता, त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने संशयित उषा पांडुरंग काटे व सपना रविंद्र गोंधळी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांनी या बकर्या बुलढाणा जिल्ह्यातील मोताडा तालुक्यातील बोराखेडी येथून चोरी केल्याची कबुली दिली.