जळगाव लाईव्ह न्यूज । २७ फेब्रुवारी २०२३ । शेतकऱ्यांनी भाव मिळत नाही म्हणून एकीकडे कापूस घरात साठवून ठेवला आहे तर दुसरीकडे. घरात साठविलेल्या कापसाला आता कीड लागून कापसाचे वजनही कमी होत आहे. गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाका वाढल्याने कापूस पूर्णता कोरडा होत आहे. मात्र आता कापसाचा भाव वाढू शकतो.
सेबीने कापूस वायद्यांवरील बंदी उठवली असून मल्टी कमोडिटी एक्सचेंज अर्थात एमसीएक्सवरील कापूस वायदे सुरू झाले आहेत. या वायद्यांमूळ कापसाला आधार मिळालाय. आंतरराष्ट्रीय बाजार कापसाची तेजी सुरू झाली आहे. त्यात बांगलादेशातही कापसाची निर्यात सुरू आहे. चीनकडून कापूस खरेदीसाठी हालचाली सुरू झाली आहे. तसेच मध्यंतरी काढून टाकलेलं आयात शुल्क आता ११ टक्के कायम ठेवलं आहे. त्यामुळे आता कापसाला भाव वाढीचे पोषक वातावरण तयार झाले आहे
जिल्ह्यातील कापसाचा भाव हा ७५०० ते ८००० रुपये इतका आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भाव मिळत नसल्याने भाववाढ कापसाचा भाव १०००० झाला नाहीये. यामुळे शेतकऱ्यांनी आपला कापूस घरात ठेवला आहे. संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील ८० ते ८५ टक्के कापूस अद्याप शेतकऱ्यांच्या घरात आहे.