⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | अभिनामास्पद : जळगावच्या बालशास्त्रज्ञांचे रॉकेट झेपावले आकाशात

अभिनामास्पद : जळगावच्या बालशास्त्रज्ञांचे रॉकेट झेपावले आकाशात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ फेब्रुवारी २०२३ । अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन, स्पेस झोन इंडिया आणि मार्टिन ग्रुप यांच्यावतीने नुकतेच डॉ एपीजे अब्दुल कलाम सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल मिशन 2023 आयोजित करण्यात आला होते. देशभरातील इयत्ता ६वी ते १२वीपर्यंतच्या ५००० विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM) वर काम करण्यासाठी प्रेरित करणे आणि त्यांचे पर्यवेक्षण करणे आणि 150 PICO च्या डिझाइन आणि विकासासाठी त्यांना त्यांचे ज्ञान आणि कौशल्ये वापरण्यास सक्षम करणे हे या अभियानाचे उद्दिष्ट होते. या उपक्रमाअंतर्गत जळगावच्या बालशास्त्रज्ञांचे रॉकेट आकाशात झेपावले. ( Dr APJ Abdul Kalam satellite launch vehicle (SLV) mission-2023)

तेलंगणाचे राज्यपाल आणि पुद्दुचेरीचे लेफ्टनंट गव्हर्नर, डॉ तमिलिसाई सुंदरराजन, पुडूचेरी विधानसभेचे अध्यक्ष अण्णाम्मी एम्बलम यांच्या उपस्थितीत डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम सॅटेलाइट लाँच व्हेईकल मिशन 2023 चे सॉफ्ट प्रक्षेपण झाले. पद्मश्री पुरस्कारप्राप्त इस्रोचे डॉ. एपीजेएम. नाजेमा मरईकायर (AKIF), एपीजेएमजे शेख दाऊद (एकेआयएफ), APJMJ शेख सलीम (AKIF), डॉ आनंद मेगलिंगम (SZI), डॉ. Rtn. लीमा रोज मार्टिन (मार्टिन ग्रुप), डॉ. जोस चार्ल्स मार्टिन , डॉ. सुलतान अहमद इस्माईल , डॉ. बी. वेंकटरामन, T.N.C वेंकटरांगन (तांत्रिक सल्लागार – AKIF), डॉ. आर. राजेंद्रन (AWR) कामराजर मणिमंडपम, पुडुचेरी येथे उपस्थित होते.  (PICO satellites)

तामिळनाडू येथील पट्टीपुलंम येथून यशस्वी रित्या भारतातील पाहिले हायब्रीड रॉकेट लाँच झाले. त्या सोबत विद्यार्थ्यांनी बनविलेले १५० उपग्रह अवकाशात यशस्वी पणे नेण्यात आलेत. हे उपग्रह अवकाशात नेण्यासाठी वापरलेले रॉकेट सुद्धा भारतीय बनावटीचे असून या रॉकेट मध्ये २ प्रकारचे इंधन वापरण्यात आले. या रॉकेट बाबत सर्व प्रशिक्षण सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आले होते. या मिशनचे वैशिष्ट्य असे कि संपूर्णपणे भारतीय विद्यार्थ्यांची हि मिशन होती. . संपूर्ण जगात अशी स्टुडंट्स मिशन आजवर झालेली नसल्याने अर्थातच वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये सर्व विद्यार्थ्यांची नोंदणी झाली. (Dr APJ Abdul Kalam organisation)

प्रक्षेपण ठिकाणी डॉ आनंद मॉलिगंम याना मार्गदर्शन करण्यासाठी इसरोचे वैगन्यानिक श्री गोकुळ प्रत्यक्ष हजर होते. काउन्ट डाउन संपताच हे हायब्रीड रॉकेट १५० पिको उपग्रहासोबत अवकाशात झेपावले आणि लगेच सर्व उपग्रह आपापले कार्य करून जमिनीवर उभारलेल्या केंद्राशी संपर्क करून वातावरणातील विविध माहिती पाठवू लागलेत. ३७९ सेकंड नंतर रॉकेट मधील इंधन संपले आणि रिकेत ने १५० उपग्रह अवकाशांत सोडले. सर्व उपग्रह पॅराशूट चे साहाय्याने अवकाशातील सब ऑर्बिट मध्ये तरंगू लागले. त्याच वेळी रॉकेटच्याआतील भागात असलेला पॅराशूट सुद्धा उघडला गेला आणि त्याचे साहायाने रॉकेटचा परतीचा प्रवास सुरु झाला. प्रक्षेपण स्थळ पासून ६.५ कमी अंतरवर रॉकेट समुद्रात उतरले . कोस्ट गार्डस चे मदतीने रॉकेट परत हस्तगत करण्यात आले.

या रॉकेटचा उपयोग परत पुढील मिशन साठी करता येणार आहे. अतिशय रोमांचित असलेल्या या मोहिमेत महाराष्ट्र मधील कानाकोपऱ्यातून विद्यार्थी पालक शिक्षक यांनी पट्टीपुलंम ला हजेरी लावली. अवकाश संशोधन संबधी विद्यार्थ्यांना चालना देणारी हि मोहीम डॉ.आनंद मॉलिगंम या २९ वर्षे वयाचे तरुण वैद्यानियकाच्या संचलनात पार पडली.

डॉ एपीजे अब्दुल कलाम सॅटेलाइट लाँच व्हेईकल मिशन २०२३ मध्ये सहभागी होण्यासाठी ५,००० उमेदवारांमधून संपूर्ण महाराष्ट्रातून ५३० विद्यार्थ्यांचा या मोहिमेत सहभाग होता. हे अभिमास्पद आहे. या विद्यार्थ्यांना आधी १० दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले होते. मोहित चौधरी यांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले. त्या नंतर महाराष्ट्रात पुणे, परभणी आणि नागपूर येथे एक दिवसीय कार्यशाळा डॉ एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फौंडेशन तर्फे आयोजित करण्यात आली होती. मुलांनी 150 पिको उपग्रहांचे डिझाईन आणि विकसित केले होते.

जळगावच्या या विद्यार्थ्यांचा समावेश
या उपक्रमामध्ये जळगावच्या लिटील व्हॅली इंग्लींश मिडीयम स्कूल कासोदाच्या हर्षदा पाटील, कुणाल तडवी, वेदांत मोरे, मानसी सूर्यवंशी, मोनाली पाटील, वेदांत शिनकर, स्वाती वारे, रुचिका पाटील, अमृता दंडगव्हाळ, मयुरेश पाटील, विकास बारेला, अंकेश पाडवी या १२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. 

author avatar
टीम जळगाव लाईव्ह