जळगाव शहर

तर फुलमार्केटच्या दुकानदारांवरच होणार कारवाई

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ फेब्रुवारी २०२३ । ‘तुमच्या दुकानासमोर अतिक्रमणधारक किंवा त्याचे साहित्य दिसल्यास आपल्यावर कडक कारवाई करण्यात येईल अशी नोटीस मनपातर्फे फुले मार्केट मधील दुकानदारांना मनपातर्फे देण्यात आल्या आहेत. फुले मार्केटमधील अतिक्रमणावर कारवाई करूनही महापालिकेतर्फे त्यांना आळा घातला जात नाहीये. पर्यायी मनपा आक्रमक झाली आहे.

शहरातील फुले मार्केटटमधील वाढलेले अतिक्रमण महापालिकेसाठी डोकेदुखी ठरत आहे. कारण महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागातर्फे अनेकवेळा कारवाई करूही अतिक्रमण थांबत नाहीये. उलट दिवसेंदिवस वाढत आहे.

अतिक्रमण होण्यास काही दुकानदारच जबाबदार असल्याचा आरोप महापालिका प्रशासनातर्फे केला जात आहे. दुकानदार आपल्या दुकानासमोरील जागेवर दुकाने लावण्यासाठी, तसेच त्यांचे साहित्य ठेवण्यासाठी अतिक्रमणधारकांकडून भाडे घेत असतात. दुकानदारांच्या या संरक्षणामुळेच प्रत्येक दुकानासमोर अतिक्रमण होत आहे.

Related Articles

Back to top button