जळगाव लाईव्ह न्यूज । १० मे २०२१ । राज्यासह जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव थांबत नसल्याने संचारबंदी लागू करण्यात आली असून अत्यावश्यक सेवेतील दुकानांना सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंतच परवानगी देण्यात आली आहे. पाचोरा शहरात आज सोमवारी नागरिकांची खरेदी करण्यासाठी अक्षरश झुंबड उडाली. किराणा दुकान आणि भाजी दुकानांमध्ये नागरिकांनी गर्दी केली. यावेळी ग्राहकांनी व दुकानदारांनी कोरोनाचे सर्व नियम पायदळी तुडवले. सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले.
दैनंदिन व्यवहार पार पाडणे हे जरी गरजेचे असलेतरी प्रत्येकाने आपल्याला कोरोनापासून सुरक्षित रहाण्यासाठी काळजी घेणे गरजेचे होते. व त्याकरिता एकमेव उपाय म्हणजे सामाजिक अंतर राखणे हा आहे.
तरीही आम्ही लॉकडाऊचे सर्व नियम खिश्यात घालून बिनधास्त फीरत आहोत. पाचोरा शहरात नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी तसेच पोलिस यंत्रणा रात्रंदिवस झटत आहे. तेही आपण सुरक्षित रहावे म्हणून परंतु आम्हाला याची जराही कदर नाही.
आज पाचोरा शहरात जणू यात्राच भरल्याचचा अनुभव येत होता. पाचोरा शहरात सर्वदूर अलोट गर्दि दिसून येत होती. विशेष म्हणजे आम्ही इतके संवेदनश शुन्य झालो आहोत की ॲम्बुलन्स व पोलिसांच्या गाडीचा सायरन वाजल्यानंतर ही आम्ही इंचभर इकडेतिकडे सरकण्याची तसदी घेत न घेता बघ्याची भूमिका पार पाडतांना दिसून येत होतो.
या गर्दीच्या मागचे कारण म्हणजे अक्षय तृतीया व रमजान ईद हे महत्त्वाचे सण येत्या १४ तारखेला आहेत. व या सणानिमित्त खरेदी करण्यासाठी ग्राहकांची एकच गर्दी उसळली व्यावसायिक आणि नागरिकांच्या नियम मोडल्या मुळे लॉकडाऊचा फज्जा उडत आहे.
परंतु हे कोरोनासारख्या महामारीच्या आजाराला आमंत्रण देण्यासाठी घातक ठरत असून आता कडक अमलबजावणीची गरज आहे. तसेच नागरिकांनी व इतरांनी लॉकडाऊन चे नियम पालन करावे घरातून एकाच व्यक्तीने सामान खरेदी करण्यासाठी बाजारात यावे आणि मास्क, सॅनिटायझर आणि सामाजिक अंतर ठेवावे.