जळगाव लाईव्ह न्यूज | २४ जानेवारी २०२३ | केवळ मराठी भाषिक नाहीत म्हणून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९९९ साली जळगावचे माजी आमदार सुरेश जैन यांना मुख्यमंत्री करायला नकार दिला होता. याबाबदचा गौप्यस्फोट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे.(why suresh jain was not the cm of maharashtra)
नुकतेच विधान भवनात बाळासाहेबांचे तैलचित्र अनावरण झाले. यावेळी ते बोलत होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना प्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या अनेक आठवणी त्यांनी सांगितल्या.आणि टाळ्या आणि हश्या मिळवला. मात्र त्या ओघात त्यांची मराठी भाषिकांविषयीची भूमिका सांगताना राज यांनी जळगावचे माजी आमदार सुरेशदादा जैन यांचा उल्लेख केला. (raj thakre on suruesh dada jain news)
यावेळी ते म्हणाले की, १९९९साली प्रकाश जावडेकर या भाजपच्या नेत्यांनी येऊन आपल्याला सांगितले की, आपले सरकार येते आहे. सुरेश जैन यांना मुख्यमंत्री केल्यास ते पुरेसे आमदार खेचून आणणार आहेत. हा निरोप आपण बाळासाहेबांना दिला. त्यावेळी हा निरोप घेऊन राज ठाकरे बाळासाहेबांकडे गेले. बाळासाहेब झोपले होते. यावेळी त्यांना राज यांनी उठवण्याचा राज यांनी प्रयत्न केला आणि भाजपचा निरोप कळवळा. उठताच क्षणी बाळासाहेब ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र्राचा मुख्यमंत्री मराठी माणूसच होईल इतर कोणीही होणार नाही.