पदवी घेताना किंवा घेतल्यानंतर अनेक विद्यार्थी शासकीय सेवेत जाण्याचं स्वप्न पाहतात. अशातच शासकीय सेवेत जाण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी मोठी बातमी आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने म्हणजेच MPSC ने तब्बल ८ हजार १६९ जागांची भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही भरती MPSC च्या नवीन अभ्यासक्रमानुसार होणार आहे. यासाठी गट-ब आणि गट-क मधील पदांसाठी संयुक्त परीक्षा घेण्यात येणार आहे.
परीक्षा कधी असणार?
MPSCने तब्बल ८ हजार १६९ जागांची जाहिरात काढली आहे. त्यानुसार गट-ब आणि गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ ही परीक्षा येत्या ३० एप्रिलला होणार आहे. यामुळे अभ्यासासाठी तीन महिन्यांचा कालावधी आहे. राज्यातील ३७ केंद्रावर ही परीक्षा होणार आहे. गट-ब सेवा मुख्य परीक्षा २ सप्टेंबरला आणि गट-क सेवा मुख्य परीक्षा ९ सप्टेंबर रोजी घेण्यात येईल.
रिक्त पदांचा तपशील :
लिपिक-टंकलेखक 7034 जागा
सहायक कक्ष अधिकारी 78 जागा
राज्य कर निरीक्षक 159 जागा
पोलीस उप निरीक्षक 374 जागा
दुय्यम निबंधक 49 जागा
दुय्यम निरीक्षक 06 जागा
तांत्रिक सहायक 01 जागा
कर सहायक 468 जागा
शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
तुम्हाला इतका मिळणार पगार
लिपिक-टंकलेखक 19,900 – 63,200 रुपये प्रतिमहिना
सहायक कक्ष अधिकारी 38,600 – 1,22,800 रुपये प्रतिमहिना
राज्य कर निरीक्षक 38,600 – 1,22,800 रुपये प्रतिमहिना
पोलीस उप निरीक्षक 38,600 – 1,22,800 रुपये प्रतिमहिना
दुय्यम निबंधक 38,600 – 1,22,800 रुपये प्रतिमहिना
दुय्यम निरीक्षक 32,000- 1,01,600 रुपये प्रतिमहिना
तांत्रिक सहायक 29,200 – 92,300 रुपये प्रतिमहिना
कर सहायक 25,500 – 81,100 रुपये प्रतिमहिना
Online अर्ज: Apply Online [Starting: 25 जानेवारी 2023]