जळगाव लाईव्ह न्यूज | १९ जानेवारी २०२३ | यंदाच्या मोसमात कापसाच्या दरात चांगलाच चढ-उतार पहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात ८५०० पर्यंत गेलेल्या कापसाचे दर पुन्हा ३०० ते ५०० रुपयांनी कमी झाले आहेत. कापसाचे दर सध्यस्थितीत ७९०० ते ८१०० प्रतिक्विंटलपर्यंत आहेत.यामुळे पुढेही कापसाचे भाव पडतातकी काय ? असा प्रश्न नागरिक विचारात आहेत.
गेल्यावर्षी कापसाचे दर १० ते ११ हजारपर्यंत गेले होते. मात्र, हे दर यंदा कमी झालेले आहेत. हंगाम सुरु धुळे- झाल्यानंतर काही प्रमाणात कापसाचे दर वाढले होते. मात्र, दिवाळीनंतर कापसाच्या दरात घटच झालेली दिसत आहे. कापसाचे दर वाढत नसल्यामुळे शेतकरी देखील आपला माल विक्री करणे टाळत आहेत.
शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल अशा १० हजार रुपये भावाची अपेक्षा आहे. भाव वाढत नसल्याने शेतकरी कापूस आणत नसल्याने, संपूर्ण जिल्ह्यातील जिनींग व्यवसायदेखील आहे. कॉटन बाजारात मालाअभावी मंदीचे सावट आहे. मात्र मकर संकातनंतर निर्यात वाढते व भाव वाढतात असा अंदाज लावला जात आहे. यामुळे पुन्हा भाव वाढतील असे म्हटले जात आहे.