ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी ३० दिवसांत खर्चाचा तपशील सादर करावा
जळगाव लाईव्ह न्युज ! १४ जानेवारी २०२३ ! जिल्ह्यातील माहे ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 मध्ये मुदत संपणा-या 140 ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया 20 डिसेंबर 2022 रोजी पार पडली आहे.
या ग्रामपंचायत सदस्य व सरपंच पदासाठी निवडणूक लढविणा-या उमेदवारांनी निकाल घोषित झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसांच्या आत निवडणूक खर्चाचा हिशोब सादर करणे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम 14 (ब) अन्वये बंधनकारक आहे. तरी सर्व निवडणूक लढविण्यात आलेल्या उमेदवार व सरपंच यांनी निवडणूक खर्च मुदतीत सादर करावा. असे आवाहन उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
जळगाव जिल्ह्यात निवडणूक झालेल्या ग्रामपंचायती संख्या 140, सरपंच व सदस्यांच्या एकूण जागा 1348, बिनविरोध झालेले उमेदवार 431, निवडणूक लढविलेले उमेदवार 2555, खर्चाचा हिशोब देण्याचा अंतिम दिनांक 19 जानेवारी, 2023 आहे. असेही उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांनी कळविले आहे.