विप्रो कंपनीतून 33 लाखांचा संतूर साबण लांबवला : दोघांविरोधात गुन्हा
जळगाव लाईव्ह न्यूज | १० जानेवारी २०२३ | अमळनेर येथे विप्रो कंपनीतून निघालेला 33 लाखांचा संतूर साबणाची ट्रक चालकाने विल्हेवाट लावल्याने दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.(theft in wipro company)
अनिलकुमार माइसुख पुनिया (रा.मंगलमुर्ती चौक, अमळनेर) यांनी फिर्याद दिल्यानुसार 4 जानेवारी रोजी विप्रो लि. कंपनी, अमळनेर यांच्या कडील 18 टन 100 किलो तयार संतुर साबण तुमकुर (कर्नाटक) येथे पोहोचवायचा होता. त्यासाठी मामा ट्रान्सपोर्ट कंपनी (अमळनेर) यांना याबाबतचे काम देण्यात आल्यानंतर साबणाने भरलेला ट्रक चालक कैलास श्रीराम गुर्जर (रा. हर्षलो का खेडा, पो.भागुनगर, ता.जहाजपुर, जि.भिलवाडा, राज्य राजस्थान) हा घेवून रवाना झाला होता. चालकास अनिलकुमार पुनिया यांनी डिझेल व इतर खर्चाकरीता 50 हजार रुपयांचे आय.यु.सी.एल. कार्ड दिले होते. त्यानुसार त्याने सदरचे कार्ड स्वीप करुन अमळनेर शहरातील प्रमुख पेट्रोलपंपावर डिझेल भरले होते व उरलेली रक्कम ही त्याने पोहच केल्यावर दिली जाणार होती. सदरचा माल ट्रक चालक याने 9 जानेवारी रोजी पावेतो तुमकुर (कर्नाटक) येथे पोहेचविणे अपेक्षीत होते परंतु सदरचा माल हा ठरल्या वेळेप्रमाणे ठरलेल्या ठिकाणी न पोहोचला नाही. (santoor company theft)
अनिलकुमार पुनिया यांनी चालक कैलास श्रीराम गुर्जर याच्या तसेच ट्रक मालक पुष्पेद्रसिंग सुदानसिंग चहर याच्या मोबाईलवर आणि नमुद ट्रक हा ज्या ट्रान्सपोर्टवरुन अमळनेर येथील ट्रान्सपोर्ट वर आला होता त्या महावीर ट्रान्सपोर्टचे (जयपूर, राजस्थान) मालक मोहन बेरवा यांच्यामोबाईलवर देखील संपर्क केल. परंतू सर्वांचे मोबाईल बंद येत होते. त्यामुळे तब्बल 33 लाखांचा लंपास केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अमळनेर पोलिसात तक्रार देण्यात आली. या प्रकरणी ट्रक (क्र.आर.जे.11 जी.ए.8138) वरील चालक- कैलास श्रीराम गुर्जर व ट्रक मालक- पुष्पेद्रसिंग सुदानसिंग चहर (रा.मुरली विहार,देवरीठा, शाहगंज, आग्रा राज्य-उत्तरप्रदेश) अशा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे करीत आहेत.