⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | रावेर | सावदा येथे कोव्हेक्सीनच्या दुसऱ्या डोसची नागरिकांना प्रतीक्षा

सावदा येथे कोव्हेक्सीनच्या दुसऱ्या डोसची नागरिकांना प्रतीक्षा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सावदा येथे मार्च पासून लसीकरण सुरू झालें असून येथे प्रथम जवळपास 20 दिवस व त्या पेक्षा जास्त दिवस नागरिकांना कोव्हेक्सीन ही लस देण्यात आली आता याच नागरिकांना दुसरा डोस उपलब्ध होत नसल्याने त्यांना सदर दुसरा डोस त्वरीत उपलब्ध करून देण्याची मागणी सावदा शिवसेना शहर प्रमुख सूरज परदेशी यांनी रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे व जिल्हावैद्यकीय अधिकारी श्री चव्हाण यांचे कडे केली असून त्यांनी येत्या 2 ते 3 दिवसात ही लस येथे उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे,

सावदा येथे प्रथम “कोव्हेक्सीन” घेणाऱ्या नागरिकांना प्रथम डोस घेऊन जवळपास 40 दिवस उलटून गेले असून त्यांना आता कोव्हेक्सीन चा दुसरा डोस घेणे अनिवार्य झाले असताना सदर लस येथे उपलब्ध होत नसल्याने नागरिकांची चांगलीच वणवण होत असून अनेक दुसऱ्या ठिकाणी किंवा खाजगी रुग्णालयात देखील ती उपलब्ध होत नसल्याने आता या नागरिकांना चिंता लागली असून जर दुसरा डोस वेळेत मिळाला नाही तर आता पुढे काय करावे ही देखील चिंता लागून आहे, येथील ग्रामीण रुग्णालयात तपास केला असता वरून जी लस येईल ती आपण देतो आम्हाला कोणती लस हवी ती मागणी करता येत नाही असे समजले त्या मुळे आता कोव्हेक्सीन च्या दुसऱ्या डोस साठी नागरिकांना आता मात्र पर्याय सापडत नसल्याचे चित्र सध्या शहरात आहे,

कोव्हेक्सीन च्या दुसरा डोस मिळेल। या आशेने दररोज नागरिक सकाळ पासून येथील लसीकरण केंद्रावर गर्दी करतात मात्र सदर लस उपलब्ध नसल्याचे समजताच त्यांना परत माघारी फिरावे लागते हा प्रकार सुमारे 8 ते 10 दिवसा पासून सुरू आहे. याच सर्व प्रश्ना बाबत अनेक नागरिकांनी शिवसेना पदाधिकारी यांचे कडे तक्रार केल्यावर लागलीच सावदा शिवसेना शहर प्रमुख सूरज परदेशी यांनी तात्काळ जिल्हावैद्यकीय अधिकारी श्री चव्हाण व रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे यांना याबाबत फोन वरून संपर्क साधला व सदर नागरिकांची कैफियत मांडली व त्वरित येथे कोव्हेक्सीन ही लस उपलब्ध करून देण्याची मागणी केली यावेळी जिल्हावैद्यकीय अधिकारी व तहसीलदार यांनी देखील सदर बाब लक्षात घेऊन सावदा येथे येत्या 2 ते 3 दिवसात आपण सदर कोव्हेक्सीन लस उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले यामुळे शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून हा दुसरा डोस उपलब्ध झाल्यास सदर नागरिकांचे व्हेकसिनेशन देखील पूर्ण होणार आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.