‘या’ महिन्यात साेन्याचा भाव ६० हजारांवर जाणार ; वाचा आजचा भाव?
जळगाव लाईव्ह न्यूज । २८ डिसेंबर २०२२ । गेल्या काही दिवसापासून सोने आणि चांदीचे भाव सातत्याने वाढतच आहे. यामुळे प्रती ताेळे (१० ग्रॅम) ५२ हजारांपासून सुरू झालेली वाढ गेल्या आठवड्यात ५४ हजार ५०० ते ५५ हजार दरम्यान स्थिरावली आहे. दरवाढीचा आलेख चढता आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यांपर्यंत प्रती ताेळा साेन्याचे भाव ६० हजारांचा टप्पा गाठण्याचा अंदाज आहे. Gold Silver Rate Today
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आज सकाळी सोन्याच्या किमतीत किंचित घसरण झाली आहे. सध्या १० ग्रॅम सोन्याचा भाव ५४,९१२ रुपये इतका आहे. दुसरीकडे काल मंगळवारी चांदीच्या किमतीत तब्बल 1107 रुपयाची वाढ झालेली आहे. त्यामुळे चांदीचा प्रति किलोचा भाव ७० हजाराच्या उंबरवठ्यावर आला आहे. सध्या चांदीचा दर ६९,७९४ रुपये प्रति किलो इतका आहे.
उच्चाकापासून सोने १२०० रुपयांहून अधिकने स्वस्त?
सोने सध्या त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकावरून १२५० ते १३०० रुपये प्रति १० ग्रॅमने स्वस्त विकले जात आहे. यापूर्वी ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याच्या किमतीने ५६,२०० रुपयांचा सर्वकालीन उच्चांक गाठला होता.
सध्या बाजारात दरवाढीचा आलेख चढता आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यांपर्यंत प्रती ताेळा साेन्याचे भाव ६० हजारांचा टप्पा गाठण्याचा अंदाज आहे. दर वाढण्यामागे काही विशेष कारण नाही; परंतु डाॅलर्सचे दर व अमेरिकन गाेल्ड मार्केटमधील चढ-उतार व ग्राहकांची मानसिकता हे प्रमुख दरवाढीचे कारण सांगितले जाते आहे.
दरम्यान, वाढत्या दरातही मोठ्या संख्येने ग्राहक हे सोने खरेदीसाठी गर्दी करत असल्याचं दिसून येतंय. या गर्दी मागे दोन कारणे आहेत. एक म्हणजे सध्या सुरू असलेली लगीन सराई आणि दुसरे म्हणजे सोने दरात अजून वाढ होण्याचा अंदाज. यामुळे सोने खरेदीसाठी ग्राहकांनी दुकानांमध्ये गर्दी केली आहे.