⁠ 
गुरूवार, डिसेंबर 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘या’ सरकारी बँकेच्या तब्बल ६०० शाखा होणार बंद ; तुमचे खाते तर नाही ना?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मे २०२२ । जर तुमचे खाते सार्वजनिक क्षेत्रातील सेंट्रल बँक ऑफ इंडिया (CBI) मध्ये असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी बँकेने मोठ्या प्रमाणात शाखा बंद करण्याचा विचार केला आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेनुसार, बँक आपल्या देशभरातील १३ टक्के शाखा बंद करण्याचा विचार करत आहे.

देशभरात 4594 शाखा
बँक मार्च 2023 पर्यंत देशभरातील 600 शाखा बंद करण्याचा किंवा तोट्यात चाललेल्या शाखांचे विलीनीकरण करण्याचा विचार करत आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या देशभरात ४५९४ शाखा आहेत.

विशेष म्हणजे 2017 मध्ये, सेंट्रल बँक ऑफ इंडियासह अनेक बँकांना RBI च्या त्वरित सुधारात्मक कृती (PCA) यादीत टाकण्यात आले होते. वाईट आर्थिक स्थितीतून जात असलेल्या बँकांना या यादीत टाकण्यात आले आहे.

2018 मध्ये 12 बँकांना PCA मध्ये स्थान देण्यात आले
या यादीत येणाऱ्या बँकांना अनेक बंधने घालून त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्याची संधी देण्यात आली होती. 2018 मध्ये देखील 12 बँकांना RBI च्या PCA फ्रेमवर्कमध्ये ठेवण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्यामध्ये 11 सरकारी आणि एक खाजगी बँक होती. ज्यांना अतिरिक्त खेळते भांडवल प्रदान करण्यात आले.

इतर सर्व बँकांची आर्थिक स्थिती सुधारली
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सेंट्रल बँक ऑफ इंडिया वगळता इतर सर्व बँका पीसीए यादीतून बाहेर आल्या आहेत. परंतु आर्थिक स्थितीत कोणतीही सुधारणा न झाल्याने सेंट्रल बँक या यादीत राहिली. अशा परिस्थितीत बँकेची आर्थिक स्थिती सुधारण्याच्या उद्देशाने 13 टक्के शाखा बंद करण्याचा विचार केला जात आहे.