⁠ 
रविवार, एप्रिल 28, 2024

ग्राहकांना झटका ! सोन्याच्या किमतीने ओलांडला 54 हजाराचा टप्पा, वाचा आजचे भाव??

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ डिसेंबर २०२२ । सोने आणि चांदी खरेदीचा प्लॅन असलेल्या ग्राहकांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. ती म्हणजे भारतीय वायदा बाजारात, आज मंगळवार,13 डिसेंबर रोजी सोने आणि चांदीच्या किमती हिरव्या चिन्हात व्यवहार करत आहेत. सततच्या वाढीने सोन्याच्या किमतीने 54 हजाराचा टप्पा ओलांडला आहे. तर दुसरीकडे चांदीच्या किमतीने 68 हजाराचा टप्पा ओलांडला आहे. Gold Silver Rate Today

आज फ्युचर्स मार्केटमध्ये सकाळी सोन्याचा भाव 122 रुपयांनी वाढून 54,254 रुपये प्रति 10 ग्रॅमवर गेला आहे. तर दुसरीकडे चांदीच्या किमतीत आज 483 रुपयाची वाढ झालेली आहे. त्यामुळे एक किलो चांदीचा दर 68,269 रुपायांवर गेला आहे. आज सोन्याचा भाव 54,132 रुपयांवर उघडला. उघडल्यानंतर, एकदा किंमत 54,197 रुपयांवर गेली. काही काळानंतर तो पुन्हा वाढून 54,254 रुपयांपर्यंत गेला

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने घसरले
आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोने लाल चिन्हावर व्यवहार करत आहे, तर चांदीमध्ये तेजी दिसून येत आहे. कालच्या बंद किमतीच्या तुलनेत मंगळवारी सोन्याची स्पॉट किंमत 0.61 टक्क्यांनी घसरून $1,784.05 प्रति औंस झाली. त्याच वेळी, आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची किंमत आज हिरव्या रंगात व्यवहार करत आहे. चांदीचा दर 0.19 टक्क्यांनी वाढून 23.39 डॉलर प्रति औंस झाला आहे. गेल्या एका महिन्यात सोन्याच्या भावात 1.56 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच चांदीचा दरही ३० दिवसांत ७.०६ टक्क्यांनी वाढला आहे.