जळगाव लाईव्ह न्यूज |६ डिसेंबर २०२२ | डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व राष्ट्रीय संस्कार केंद्र आणि सामाजिक समरसता मंच तर्फे संघाचे कार्यालय, बळीराम पेठ येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
रक्तदान कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तसबिरीला माल्यार्पण करून करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अॅड. श्री सुशील अत्रे, करूणा सपकाळे, व श्री प्रविण भाटे, दिपक वाणी, डॉ. राधेश्याम चौधरी उपस्थित होते.
या कार्यक्रमाला केशव स्मृती प्रतिष्ठान संचलीत माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्त केंद्र यांचे सहकार्य लाभले. सकाळी ०९.०० ते दुपारी ०१.०० दरम्यान हे शिबीर घेण्यात आले. यात १५ हुन अधिक नागरिकांनी रक्तदान केले.