सोन्याच्या किमतीने पुन्हा तोडले रेकॉर्ड, काय आहे प्रति 10 ग्रॅमचा भाव? पाहा..
जळगाव लाईव्ह न्यूज । ५ डिसेंबर २०२२ । ऐन लग्नसराईत सोने आणि चांदीच्या किमती वाढल्या आहे. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. आजच्या झालेल्या दरवाढीने सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव 54 हजारांवर गेला आहे. सोबतच चांदीची महागली आहे. त्यामुळे चांदीचा दरही 67 हजाराच्या दिशेने जाऊ लागले आहे. Gold Silver Rate Today
आज मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा भाव 219 रुपयांनी वाढून 54,087 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. शेवटच्या ट्रेडिंग सत्रात म्हणजेच शुक्रवारी सोने 0.2 टक्क्यांनी घसरून 53,880 रुपयांवर बंद झाले. मात्र आज वाढ झालेली दिसून आलीय.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये आज चांदीच्या दरात तेजी पाहायला मिळत आहे. आज चांदीचा भाव 276 रुपयांनी वाढून 66,725 रुपयांवर व्यवहार करत आहे. गेल्या सत्रात चांदीचा भाव 1,041 रुपयांनी वाढून 66450 रुपयांवर बंद झाला होता.
आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीची किंमत आजच्या चिन्हावर आहे. सोमवारी सोन्याची स्पॉट किंमत 0.55 टक्क्यांनी वाढून $1,807.74 प्रति औंस झाली. त्याचवेळी आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची किंमतही आज ०.८७ टक्क्यांनी वाढून २३.३६ डॉलर प्रति औंस झाली आहे. गेल्या एका महिन्यात सोन्याच्या भावात ७.३८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच चांदीच्या दरातही 30 दिवसांत 11.50 टक्क्यांनी वाढ झाली आहे.