जळगाव लाईव्ह न्यूज । ०५ मे २०२१ । जळगाव शहरातील खोटेनगर स्टॉपला तालुका पोलिसांकडून विनाकारण फिरणाऱ्यांची अँटीजन टेस्ट करण्यात आली. ९० लोकांच्या तपासणीत एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला.
शहरात दररोज अनेक नागरिक विनाकारण बाहेर फिरत असतात. जिल्हा पोलीस प्रशासनाकडून दररोज वेगवेगळ्या चौकात नागरिकांची अँटीजन टेस्ट करण्यात येते. मंगळवारी खोटेनगर स्टॉपला तालुका पोलिसांकडून मनपाचे डॉ.संजय पाटील व पथकाच्या मदतीने ९० नागरिकांची अँटीजन टेस्ट करण्यात आली. कारवाईत १ रुग्ण पॉझिटिव्ह मिळून आल्याने त्याला कोविड केअर सेंटरला रवाना करण्यात आले.
शारीरिक अंतर राखले जात नसल्याने पोलिसांनी ६ कारवाया करीत १२०० रुपयांचा दंड देखील वसूल केला. तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्री.कासार, सहाय्यक उपनिरीक्षक राठोड, हवालदार राजेश पाटील, वासुदेव मराठे, बापू पाटील, फेगडे, पोलीस नाईक गायकवाड, संदीप पाटील, बापू कोळी, दुसाने, ठाकूर आणि होमगार्ड यांच्या पथकाने मोहीम पार पाडली.