भुसावळात भाजप युवा मोर्चातर्फे राहुल गांधींचा निषेध
जळगाव लाईव्ह न्यूज । १९ नोव्हेंबर २०२२ । विदा सावरकर यांच्याबद्दल अपशब्द वापरणार्या काँग्रेस नेते राहूल गांधी यांच्या विरोधात भाजप, युवा मोर्चाने शुक्रवारी निषेध आंदोेलन केले. नाहाटा महाविद्यालय चौफुली चौकात राहुल गांधीच्या पोस्टरला चप्पलांचा मार देत काळे फासून निषेध व्यक्त करण्यात आला.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या अपशब्द टीकेला उत्तर व निषेध करण्यासाठी शुक्रवारी नाहाटा महाविद्यालय चौकात भारतीय जनता युवा मोर्चा व भारतीय जनता पार्टी च्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. या निषेध आंदोलनात राहुल गांधी यांचा पोस्टरला चपलेचा मार देऊन काळे फासून निषेध करण्यात आला.
या प्रसंगी युवा मोर्चा भुसावळ शहराध्यक्ष अनिरुद्ध कुळकर्णी, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष जितेंद्र कोळी, भारतीय जनता पार्टी भुसावळ शहराध्यक्ष परीक्षीत बर्हाटे, माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, माजी प्रभारी नगराध्यक्ष राजेंद्र नाटकर, जिल्हा चिटणीस शैलजा पाटील, महिला आघाडी शहराध्यक्षा अनिता आंबेकर, भारती वैष्णव, सरचिटणीस रामशंकर दुबे, अनुसूचित जमाती अध्यक्ष राहुल तायडे, माजी नगरसेवक प्रा. दिनेश राठी, युवा मोर्चाचे सरचिटणीस श्रेयस इंगळे, चेतन सावकारे, प्रशांत देवकर, चंद्रशेखर पाटील, शिशिर जावळे आदी उपस्थित होते.
स्वातंत्रवीर सावरकर यांच्या बद्दल अपशब्द बोलणार्या राहुल गांधी यांनी दोन दिवसांत विधान मागे घेवून जाहिर माफी मागावी, अशी मागणी यावेळी भाजपच्या आंदोलकांनी केली. दोन दिवसांत गांधी यांनी माफी नाही मागितली, तर भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल कण्याचा इशारा देण्यात आला.