खासदार रक्षा खडसे यांनी केला राहुल गांधींचा निषेध
जळगाव लाईव्ह न्यूज । १९ नोव्हेंबर २०२२ । “स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर” यांच्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या अपमानजनक वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानात भारतीय जनता पक्षाच्या वतीने “जाहीर निषेध सभेचे” आयोजन करण्यात आले होते. यावेळी सदर सभेस खासदार रक्षा खडसे यांनी उपस्थित राहून कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रातुन जात असून महाराष्ट्रात त्यांना फारसा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे जनतेचे लक्ष वेधून घेण्यासाठी “स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर” यांच्या बद्दल अपमान जनक वक्तव्य करून समस्त हिंदू जनासह महाराष्ट्राच्या जनमानसाचे मन दुखविण्याचे काम कॉंग्रेस करीत आहे, असे यावेळी खासदार रक्षाताई खडसे यांनी स्पष्ट केले. यावेळी सदर “जाहीर निषेध सभेस” खासदार रक्षाताई खडसे यांच्यासह माजी मंत्री आ.डॉ. रणजीत पाटील, डॉ.राजेंद्र फडके, माजी आ. चैनसुख संचेती, माजी मंत्री आ. डॉ. संजय कुटे, आ.प्रकाश पाटील भारसाकळे, आ. हरीश पिंपळे, आ. वसंतजी खंडेलवाल, बुलडाणा भाजपा जिल्हाध्यक्ष आ. आकाश फुंडकर, वाशिम भाजपा जिल्हाध्यक्ष राजू पाटील राजे, माजी आ. विजयराज शिंदे, माजी आ. शशिकांत खेडेकर, बलदेवराव चोपडे, माजी महापौर विजय अग्रवाल, प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, दिपक बोरकर, माधवराव जाधव, मा.जि.प.सदस्य शांताराम दाने, विनोद वाघ, सचिन देशमुख आदी प्रमुख नेत्यासह भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.