धक्कादायक! भुसावळात भरदिवसा बारावीच्या विद्यार्थ्यावर चाकूहल्ला
जळगाव लाईव्ह न्यूज । १८ नोव्हेंबर २०२२ । बारावीच्या विद्यार्थ्यावर भर दिवसा चाकूहल्ला झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना आज शुक्रवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास भुसावळ शहरात घडली. या घटनेने खळबळ उडाली असून हल्ल्यानंतर संशयीत पसार झाले असल्याची माहिती आहे. बाजारपेठ पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे.
आदित्य कैलास सावकारे (१८) हा तरुण जखमी झाला. सावकारे हा शहरातील नाहाटा महाविद्यालयात बारावीत शिक्षण घेत त्याच्यावर विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या पूर्वीच्या वादातून महाविद्यालयातीलच दोन विद्यार्यिांनी हिमालया पेट्रोल पंपांसमोर चाकूने हल्ला चढवला. चाकूह ल्ल्याची माहिती कळताच बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, प्रशांत परदेशी, निलेश चौधरी, तुषार पाटील, मिलिंद कंक, अतुल कुमावत यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमीला ड्रामा केअर सेंटर मध्ये उपचारार्थ हलवण्यात आले आहे.