जळगाव लाईव्ह न्यूज । १७ नोव्हेंबर २०२२ । जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागात थंडीपासून बचाव करण्यासाठी डिंकाच्या लाडूंना विशेष पसंती दिली जाते. बऱ्याच वेळेस थंडीच्या दिवसात सकाळची न्याहरी न करता नागरीक डिंकाचे पौष्टिक लाडू खाऊन आपल्या कामावर जातात. यंदा मात्र लाडवासाठी लागणाऱ्या सामग्रीचे व सुकामेव्याचे दर वाढल्याने गृहिणींचे बजेट कोलमडणार आहे. यावर्षीची महागाईचा तडाखा डिंकाच्या लाडवांचा गोडवा कमी करतो की काय? अशी सर्वत्र चर्चा आहे.
डिंक मुळात थंड असतो. मात्र, डिंक तळून वापरल्यास तो उष्ण गुणधर्माचे कार्य करतो. विशेषतः थंडीमध्ये डिंकाचे सेवन करणे, अधिक उपयुक्त ठरते, थंडीपासून बचावासाठी बहुधा ग्रामीण भागात घरोघरी डिंकाचे लाडू तयार करण्यात येतात.
सुका मेव्याचे दर असे आहेत प्रतिकिलो
काजू:- ८०० ते १२०० रुपये किलो
बदाम:- ८०० ते १००० रुपये किलो
गोडंबी: – ६०० ते ८०० रुपये किलो
साजूक तूप: ६०० ते ७०० रुपये किलो
डिंक:- २५० ते ३५० रुपये किलो
खारीक:- ३०० ते ४०० रुपये किलो
खोबरे :- १५० ते २०० रुपये किलो
मेथी:- ८० ते १०० रुपये किलो
खसखस:- ८०० रुपये किलो
जायफळ – १० रु. नग
वेलदोडा:- २००० रुपये किलो
गुळ:- ५०, रुपये किलो
रवा : ४० रुपये किलो