गुन्हेजळगाव जिल्हा
भरधाव कारने नशिराबादच्या प्रौढाला उडवले
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ नोव्हेंबर २०२२ । भरधाव कारने उडवल्याने नशिराबाद येथील 41 वर्षीय प्रौढाचा मृत्यू झाला तर सहकारी मित्र जखमी झाला. हा अपघात भानखेडा गावाजवळ रविवार, 13 रोजी दुपारी साडेचार वाजता घडला. या प्रकरणी अज्ञात चारचाकी चालकाविरोधात वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
दीपक उर्फ दिलीप गोपाळ माळी (41, नशिराबाद) असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे. तक्रारदार शेख सलीम शेख कलीम (28, नशिराबाद) हे मित्र दीपक माळी यांच्यासोबत दुचाकीने जात असताना सिल्व्हर रंगाच्या अज्ञात कारने त्यांच्या दुचाकीला उडवल्याने दिलीप माळी हे नाल्यात पडलयाने त्यांचा मृत्यू झाला तर शेख सलीम हे जखमी झाले. या प्रकरणी अज्ञात चारचाकी चालकाविरोधात वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार मनोहर पाटील करीत आहेत.