भुसावळ
भुसावळात स्व.बाळासाहेब ठाकरेंना स्मृतीदिनानिमित्त अभिवादन
जळगाव लाईव्ह न्यूज । १६ नोव्हेंबर २०२२ । स्व.बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतीदिनानिमित्त भुसावळ शहरातील बाजारपेठ पोलिस ठाण्याजवळ शिवसेनेतर्फे अभिवादन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला सर्व कार्यक्रते उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
उद्या गुरुवारी सकाळी 10 वाजता आयोजित कार्यक्रमास शहरातील सर्व शिवसैनिक, शिवसेना पदाधिकारी, युवा सेना, महिला आघाडी, रेल कामगार सेना, शिक्षक सेना व शिवसेनेच्या सर्व अंगीकृत संघटनांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील भुसावळ शहर व तालुका पदाधिकार्यांनी केले आहे.