जळगाव लाईव्ह न्यूज । १६ नोव्हेंबर २०२२ । एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना सर्व पदे ही घरातच पाहिजे, त्यांचं संपूर्ण कुटुंब तूप-लोणी खात असल्याची टीका मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केलीय. आता महाजनांच्या टीकेला प्रत्युत्तर देतांना एकनाथ खडसे यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
नेमकं काय म्हणाले खडसे?
गिरीश महाजन साधना महाजन तुमच्या कुटुंबातील की बाहेरच्या? असा सवाल करत दुर्दैवाने गिरीश महाजन यांना मुलगा नाही. नाहीतर कदाचित तो पण राजकारणात आला असता, अशी जोरदार टीका खडसेंनी केली आहे.
भाजपमध्ये घराणेशाही असलेल्यांची संख्या मोठी आहे. नारायण राणे, देवेंद्र फडणवीस हेदेखील घराणेशाही मधून आले असून त्यांना हा नियम लागू नाही का? त्यामुळे एक बोट दुसऱ्याकडे दाखवत असताना चार बोट आपल्याकडे आहेत, याचा विचार गिरीश महाजन यांनी करावा, असा टोलाही एकनाथ खडसेंनी लगावला आहे. मात्र, या आरोप प्रत्यारोपामुळे पुन्हा एकदा खडसे-महाजनांमधील संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.