⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 15, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | जळगावात लपून छपून व्यवसायक करणाऱ्या ११ दुकानांवर सीलबंदची कारवाई

जळगावात लपून छपून व्यवसायक करणाऱ्या ११ दुकानांवर सीलबंदची कारवाई

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ०४ मे २०२१ । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी जळगावमधील बळीराम पेठेतील लपून छपून व्यवसायक करणाऱ्या ११ दुकानांवर छापा टाकून कारवाई करण्यात आली आहे. यावेळी दंडात्मक कारवाई करून सीलबंद केल्याची माहिती महापालिकेचे उपायुक्त संतोष वाहूळे यांनी दिली. ही कारवाई उपायुक्त संतोष वाहूळे यांच्या मागर्दर्शनाखाली अतिक्रमण विभागातील संजय ठाकूर, सुनील पवार, किशोर सोनवणे, नाना कोळी, नितीन भालेराव, राहुल कापरे, सलमान भिस्ती व इतर कर्मचाऱ्यांनी केली.

याबाबत असे की, जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर १५ मे पर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. यात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद ठेवण्याचे कडक सुचना देण्यात आले आहे. असे असतांना जळगाव शहरात काही ठिकाणी अनेक दुकानदार शटर बंद ठेवून आत व्यवहार करत असल्याचे निदर्शनास आले आहे.  महापालिकेचे उपायुक्त संतोष वाहूळे यांच्या उपस्थितीत पथकाने आज मंगळवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास शहरातील बळीराम पेठेतील ११ दुकानांवर छापा टाकून कारवाई केली. 

या दुकानांवर केली कारवाई

यात बळीराम पेठेतील बजाज ट्रेडर्स, श्री बालाजी सन्स, अरिहंत कटलरी सेंटर, मेमसाब जनरल, निनावी तसेच जय वैष्णवी जनरल स्टोअर्स बाहेरा गल्ली, वाहेगुरू इलेक्ट्रिकल जेएमपी मार्केट, नंदुरबारकर सराफ, नागदवे इंटरप्रायझेस गजानन प्लाझा बळीराम पेठ अशा ११ दुकानांवर दंडात्मक कारवाई करत सीलबंद कारवाई केली.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.