⁠ 
शुक्रवार, जानेवारी 10, 2025
Home | जळगाव जिल्हा | अमळनेर | रस्त्यावर दगड टाकून टँकर चालकाला लुटले : आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

रस्त्यावर दगड टाकून टँकर चालकाला लुटले : आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ नोव्हेंबर २०२२ । रस्त्यावर दगड आडवे टाकून टँकर चालकाला लोखंडी रॉडद्वारे मारहाण करीत लूटण्यात आल्याची घटना अमळनेर-चोपडा रोडवर शनिवार, 5 रोजी रात्री आडेआठ वाजेच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी अमळनेर पोलिसांनी गोपनीय माहितीवरून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींच्या अटकेने अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, ज्यांच्यासोबत रस्ता लुटीचा प्रकार घडला असेल त्यांनी पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी केले आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
दरम्यान, तीनही अटकेतील आरोपी अमळनेर शहरासह ग्रामीण भागातील रहिवासी असून त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. पथकातील पोलीस उपनिरीक्षक राकेशसिंग परदेशी, पोलीस नाईक मिलिंद भामरे, सुर्यकांत साळुंखे,पोलीस कॉन्स्टेबल राहुल पाटील, राजेंद्र देशमाने आदींनी आरोपींना अटक केली. तपास पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह