जळगाव जिल्हामहाराष्ट्रराजकारण

मोठी बातमी : शिवसेना नेते शरद कोळींवर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ नोव्हेंबर २०२२ । युवासेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांच्या विरोधात आता पाचोर्यात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना- उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नुकत्याच पार पडलेल्या महाप्रबोधन यात्रेत युवासेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांची भाषणे प्रचंड वादग्रस्त ठरली.

त्यांनी धरणगावात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, पाचोर्यात आमदार किशोर पाटील तर एरंडोलमध्ये आमदार चिमणराव पाटील यांच्या विरोधात अतिशय शेलक्या शब्दांमध्ये टिका केली. या अनुषंगाने त्यांच्या विरोधात पहिल्यांदा धरणगाव आणि नंतर एरंडोलमध्ये गुन्हा दाखल झाला. यानंतर आता त्यांच्या विरोधात पाचोरा पोलीस स्थानकात देखील गुन्हा दाखल झाला आहे. पाचोरा पोलीस स्थानकात किशोर गुणवंतराव बारवकर यांनी फिर्याद दिली.

यात शरद विठ्ठल कोळी यांनी आपल्या भाषणातून आमदार किशोर पाटील यांचा अपमान केला असून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या फिर्यादीवरून त्यांच्या विरोधात भादंवि कलम

Related Articles

Back to top button