जळगाव जिल्हा

महावितरणच्या विद्युत साहित्याच्या दरसूचीमध्ये (कॉस्ट डाटा) वाढ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ नोव्हेंबर २०२२ । जळगाव जिल्ह्यातील वीज वितरण प्रणालीचे सक्षमीकरण, आधुनिकीकरण तसेच पायाभूत सुविधा उभारणीची कामे नित्याने नियमितपणे करावी लागतात. या कामांसाठी लागणाऱ्या विविध तांत्रिक साहित्याच्या दरसूचीमध्ये (कॉस्ट डाटा) वाढ करण्याचा निर्णय महावितरणकडून घेण्यात आला आहे.

महावितरणच्या क्षेत्रीय कार्यालयांतर्गत विविध विद्युतीकरणाच्या पायाभूत सुविधा उभारण्यात येतात. या पायाभूत सुविधांची कामे करण्यासाठी महावितरणकडून वेळोवेळी दरसूची जाहीर करण्यात येत असते. मात्र, कोरोना महामारीच्या कालावधीनंतर आता विद्युतीकरणासाठी लागणाऱ्या साहित्यांच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झालेली आहे. सद्य:स्थितीत २०१९-२० या वर्षांची म्हणजे करोना महामारीच्या पूर्वीची दरसूची या कामासाठी लागू आहे.

सध्या लागू असलेल्या दरसूचीमध्ये वाढ करण्याची मागणी विविध स्तरांवरून महावितरणकडे करण्यात आली होती. महावितरणने दरसूची अद्ययावत करण्यासाठी एका समितीची स्थापना करून या समितीने दरसूचीमध्ये बदल करण्यासंदर्भातील अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार सदर समितीने दरसूचीमध्ये सुचविलेल्या बदलास महावितरणच्या प्रशासनाने नुकतीच मंजुरी दिली आहे. नवीन दरसूची लवकरच जाहीर करण्यात येणार असून यामुळे महावितरणच्या नवीन पायाभूत सुविधा उभारण्याच्या कामास गती मिळणार आहे. याचा लाभ राज्यातील सर्व विद्युत ग्राहकांना होणार आहे.

Related Articles

Back to top button