जळगाव लाईव्ह न्यूज । ४ नोव्हेंबर २०२२ । भुसावळ तालुक्यातील सुरा.आंबेडकर विद्यालय कंडारी येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच झाला. तब्बल 22 वर्षानंतर जमलेल्या माजी विद्यार्थी व शिक्षकांनी जुन्या आठवणींना या प्रसंगी उजाळा दिला. राजेश झाल्टे, मनोहर खैरनार, अरुण वानखेडे, चंद्रकांत बहिरुणे, मुख्याध्यापीका सविता तायडे, शिक्षक राजेंद्र बागुल, सुभाष चौधरी, अरविंद तायडे, वरीष्ठ लिपिक संजय सुरवाडे यांची उपस्थिती होती.
प्रसंगी संस्थेला एक लाखांची देणगी देण्याची घोषणा झाल्टे यांनी करीत शाळेचा परीसर सुशोभीत करण्याचे आवाहन करीत संस्थेच्या माध्यमातून सेमी इंग्रजी, इंग्रजी माध्यमाची सुरुवात करून गोर-गरीब विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचे शिक्षण उपलब्ध करून देण्यास योग्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले. मनोहर खैरनार यांनी अभ्यासिका सुरू करण्यासह सेवानिवृत्त शिक्षकांनी शाळेच्या प्रगतीसाठी विशेष प्रयत्न करण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक त्रिरत्ना बागुल यांनी तर सूत्रसंचालन सागर बहिरुने यांनी केले. स्वागतगीत कल्पना मगरे यांनी सादर केले.
मेळावा यशस्वीतेसाठी संदीप शिंगारे, रेखा आव्हाड, त्रिरत्ना बागुल, सागर बहिरूणे, सुरेश सोनवणे, चंद्रपाल पवार, आनंद सपकाळे, गणेश मोरे, अनिल बुंदेले, शैलेंद्र बाविस्कर, सारीका गजभिये, योगीता शिंगारे , मनीषा सोनवणे, मनीषा अडकमोल, कल्पना मगरे, पौर्णिमा रामटेके, संतोष आव्हाड, संदीप कांबळे, दीपक मकासरे, विजय भालेराव, जयदेव मोरे, सिध्दार्थ सोनवणे, तुकाराम तायडे, रीतेश सोनवणे, अमोल तायडे, वैशाली तायडे, छाया बांगर, राजू गणवीर आदींनी परीश्रम घेतले.