जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ ऑक्टोबर २०२२ । भुसावळ, जळगाव रेल्वे स्थानकांचे निरीक्षण करण्यास आलेले मुंबई येथील मुख्य वाणिज्य प्रबंधक स्वप्निल वाळींजकर यांनी रेल्वे स्थानकांवरील खाद्य पदार्थांच्या स्टॉलची पाहणी केल्यानंतर जळगाव स्थानकावरील फुड ट्रॅक या स्टॉलमध्ये अस्वच्छता आढळल्याने त्या स्टॉलला तात्काळ 12 हजार रूपयांचा दंड केल्याने खाद्य पदार्थ विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
पाहणीदरम्यान आढळली अस्वच्छता
रविवारी मध्य रेल्वेचे मुख्य वाणिज्य प्रबंधक स्वप्निल वाळींजकर यांनी येथील रेल्वे स्थानकावरील मुसाफिर खान्याची पाहणी केली. यावेळी तेथे असलेल्या प्रवाशांशी संवाद साधला. रेल्वे प्रशासनाकडून दिल्या जाणार्या सुविधांबाबत त्यांच्याची चर्चा केली. रेल्वे स्थानकावर सफाई करण्यावर भर देण्याच्या सूचना त्यांनी केल्यात. यावेळी रेल्वे स्थानकावरील खाद्य पदार्थांच्या स्टॉलची तपासणी करण्यात आली व स्वच्छतेसह प्रवाशांना दिल्या जाणार्या खाद्य पदार्थांची क्वॉलिटी तपासण्यात आली. जळगाव रेल्वे स्थानकावर सुध्दा अचानक भेट देऊन स्टॉलची पाहणी केल्यानंतर फुड ट्रॅक या स्टॉलवर मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता असल्याने स्टॉल व्यवसायीकाला 12 हजारांचा दंड करण्यात आला. यावेळी स्थानकावर स्वच्छतेला प्राधान्य द्यावे, अश्या सूचना वाळींजकर यांनी दिल्यात