गुन्हे
झाडांना पाणी देताना तरुणाचा शॉकने मृत्यू
जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑक्टोबर २०२२ । मोटरच्या कट झालेल्या वायरला स्पर्श झाल्याने शॉक लागल्याने अमळनेरातील तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील टाकरखेडा-अमळनेर रस्त्यावर शुक्रवार, 28 रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास घडली. स्वप्नील मच्छींद्र पाटील (27, टाकरखेडा) असे मयत तरुणाचे नाव आहे.
झाडांना पाणी देत असताना दुर्घटना
स्वप्नील हा तरुण शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजता टाकरखेडा ते अमळनेर रस्त्यावर गट नंबर 194 व 195 मधील शेतात असलेल्या नाश्त्याच्या हॉटेलच्या आवारात झाडांना पाणी देत असताना पाण्याच्या मोटरच्या कट झालेल्या वायरवर त्याचा पाय पडला व शॉक लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अमळनेर पोलिसात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हेड कॉन्स्टेबल कपिल पाटील करीत आहेत.