जळगाव लाईव्ह न्यूज । ०१ मे २०२१ । यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने तालुक्यातील न्हावी फैजपुर येथे लोक सहभागातुन उभारणीस येणाऱ्या कोवीड१९च्या रुग्णांसाठी ऑक्सीजन बेड सेन्टर आर्थिक मदत करण्यात आली आहे.
दरम्यान यावल येथील तहसील कार्यालयात आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने चेअरमन तुषार सांडुसिंग पाटील, कृउबाचे माजी सभापती तथा विद्यमान संचालक कृषी भुषण नारायण चौधरी यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसचिव विजय कायस्थ आदींनी उपस्थित राहुन १० हजार रूपयांची मदत निवडणुक शाखेचे नायब तहसीलदार राहुल सोनवणे यांच्या स्वाधीन केले.
या प्रसंगी तहसीलचे कोषागार मुक्तार तडवी, सुयोग पाटील, संजय गांधी विभागाचे प्रफ्फुल कांबळे हे उपस्थित होते. दरम्यान फैजपुर विभागाचे प्रांत अधिकारी कैलास कडलग यांनी कोरोना बाधीत रुग्णांची ऑक्सीजन आणी वेळेवर होत नसलेल्या उपचाराअभावी होणारी भटकंती थांबविण्यासाठी लोक सहभागातुन जे.टी. महाजन अभियांत्रीकी महाविद्यालय फैजपुर तालुका यावल येथे कोवीड१९च्या रुग्णांसाठी ५० ऑक्सीजन बेड व ड्युरा सिलेंडर उभारणीचा संकल्प हाती घेत मदतीचे आवाहन केले असुन,यास रावेर व यावल तालुक्यातुन सामाजीक कार्यात सदैव अग्रेसर राहणारी दानसुर मंडळी कडुन चांगला प्रतिसाद यास मिळत आहे.