शिंदे-फडणवीस सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरला, कोणाला लॉटरी लागणार? या नावांची चर्चा

ऑक्टोबर 27, 2022 9:09 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑक्टोबर २०२२ । शिंदे, फडणवीस सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ (Cabinet Expansion) विस्ताराकडे सर्वांच्या नजरा लागून आहे. मात्र अशातच दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत एक मोठी बातमी समोर आलीय. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वी या बहुप्रतीक्षित विस्ताराला मुहूर्त मिळण्याचे चिन्हं असून यामध्ये शिंदे गटातील चार आमदारांना, तर भाजपच्या चार आमदारांना मंत्रिपदी संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

eknath shinde and devendra fadanvis

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या शपथविधीनंतर जवळपास सव्वा महिन्यांनी पहिला कॅबिनेट विस्तार झाला होता. त्यानंतर आता आणखी अडीच महिने उलटल्याने दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराची आमदारांना प्रतीक्षा आहे. १९ डिसेंबरपासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशन होणार आहे. त्यामुळे पुढच्या १५ ते २० दिवसात विस्ताराची अपेक्षा आहे. दुसऱ्या टप्प्यात कॅबिनेटबरोबरच राज्यमंत्रीपदेही भरण्यात येणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षातून कोणाला लॉटरी लागणार, याची उत्सुकता. पहिल्या विस्तारात संधी हुकलेले आणि नाराजीच्या चर्चा असलेले आमदार संजय शिरसाट यांना मंत्रिपद नक्की समजले जात आहे. याशिवाय भरत गोगावले, सदा सरवणकर, प्रकाश आबीटकर, बालाजी किणीकर, योगेश कदम यांचीही नावं चर्चेत आहेत.

ठाकरे सरकारमध्ये राज्यमंत्रिपदाची धुरा सांभाळलेले आणि शिंदे सरकारमध्ये मंत्रिपदाकडे डोळे लावून बसलेले अपक्ष आमदार बच्चू कडू यांनाही मंत्रिपद मिळणं फिक्स मानलं जात आहे. मंत्रिपद न मिळाल्याने बच्चू कडू आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now