गुन्हेमहाराष्ट्र

माझ्या मुलाला कोठडीत किंवा चकमकीत ठार मारतील ; उन्नैस पटेलच्या आईचे पोलीस महानिरीक्षकांना पत्र !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑक्टोबर २०२२ । दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) शी संबंधित जळगावमधील उन्नैस उमेर खय्याम पटेल (वय ३१, रा.अक्सा नगर, जळगाव), याला नाशिकच्या गुन्ह्यात शानिवारी अटक केली होती. त्याच्यावर अटकेतील इतर आरोपींचे मोबाईल संभाषण नष्ट करत असल्याचा आरोप आहे. दरम्यान, माझ्या मुलाला बेकायदेशीर अटक करण्यात करण्यात आली असून त्याला कोठडीत किंवा चकमकीत ठार मारतील, अशी भीती उन्नैस पटेलची आई शमीम पटेल यांनी नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षकांना ‘ई-मेल’द्वारे पाठवलेल्या तक्रारी पत्रात व्यक्त केली आहे.

शमीम पटेल यांनी नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षकांना पाठवलेल्या तक्रारी पत्रात म्हटले आहे की, 27 सप्टेंबर 2022 रोजी पहाटे 3:30 वाजता NIA, ATS आणि साध्या पोशाखातील पोलिसांचे लोकं दोन मोठ्या व्हॅनमध्ये आमच्या घरी आले आणि त्यांनी माझा मुलगा उनैस पटेल याला 151(3) अंतर्गत अटक केली. अटकेच्या वेळी त्यांनी त्यांचे ओळखपत्र दाखवले नाही. त्यांनी माझ्या मुलाला का अटक केली?, कोणत्या आधारावर केली?, याची माहितीही दिली नाही. यामुळे मी अक्षरशः त्या व्हॅनच्या मागे धावले. पण तरीही त्यांनी माझ्या मुलाला कुठे नेले?, याचे उत्तरही दिले नाही.

मला नंतर कळाले की, उन्नैसला एमआयडीसी पोलिस ठाण्यात नेले आहे. त्यांनी पंचनामा न करता उन्नैसचा लॅपटॉप आणि मोबाईल घेतला व त्याच्या पंचनाम्याची कोणतीही प्रत दिली नाही. जळगाव न्यायालयाने त्याच दिवशी उन्नैसची सुटका केली. पोलीस त्याला ताब्यात घेण्याची मागणी करत होते. परंतू माननीय न्यायाधीशांनी त्याच दिवशी त्याला 6 नोव्हेंबर 2022 पर्यंत हजेरी लावण्याच्या अटीवर सोडले. नंतर आम्हाला नाशिक एटीएसकडून सीआरपीसी 160, दोन नोटिसा मिळाल्या. 7 नोव्हेंबरला नाशिक भद्रकाली एटीएस कार्यालयात 8, 10, 12, 14, त्यानंतर 17, 19, 20, 21 नोव्हेंबरला देखील उन्नैस तपासासाठी हजर झाला. यावेळी त्याचा इतका छळ केला गेला की, त्याचे मानसिक संतुलन बिघडले. यानंतर 21 नोव्हेंबर 2022 रोजी नाशिक एटीएसने त्याला अटक केली आणि 22 नोव्हेंबर रोजी नाशिक न्यायालयात हजर केले. आम्हाला अद्याप माहित नाही की, पोलिसांनी कोणत्या आरोपाखाली उन्नैसला अटक केली आहे. आमच्याकडे एफआयआर आणि इतर कोणतीही माहिती नाही.

  1. ही बेकायदेशीर अटक आहे. 2. लॅपटॉप आणि मोबाईल कोणत्याही पंचनामा प्रत शिवाय जप्त केले. 3. या मानसिक वेदना, छळ असून खूप मानसिक ताण आहे. 4. आम्हाला शंका आहे की ते त्याला कोठडीत किंवा चकमकीत ठार मारतील. 5. कोणतेही कबुलीजबाब जबरदस्तीने लिहू शकतात. 6. त्याला इतर प्रकरणांमध्ये चुकीच्या पद्धतीने अडकवू शकतात. 7. माफीचा साक्षीदार बनवण्यासाठी त्याच्यावर दबाव आणला जाऊ शकतो.
  2. उनैस निर्दोष आहे, तो पदवीधर आहे आणि त्याचे करिअर बनवत आहे. त्याच्यावर कोणतेही गुन्हेगारी स्वरूपाचे याआधी आरोप नाहीत. कृपया त्याला त्वरित सोडण्यात यावे. 2. कोणत्याही दबावाखाली कबुली जबाब घेतले जाऊ नयेत. 3. या प्रकरणाकडे लक्ष देऊन एटीएस, पोलिस, एनआयए इत्यादींवर कारवाई करावी. तसेच मी आणि माझे पती आता म्हातारे झालो आहोत आणि पतीला आधीच ब्रेन स्ट्रोक, बीपी आणि मधुमेह सारख्या अनेक वैद्यकीय समस्यांना तोंड देत आहेत. त्यामुळे कलम 169 अंतर्गत माझा मुलगा उनैस पटेलची तात्काळ सुटका करावी. दरम्यान, हा तक्रारी ‘ई-मेल’ जळगाव पोलीस अधीक्षकांसह राज्याचे पोलीस महासंचालक यांना देखील पाठवण्यात आला आहे.

पीआयएफच्या प्रकरणात अटकेतील संशयितांनी उन्नैस पटेल याची मदत घेऊन त्यांचे मोबाइल फॉरमॅट केल्याचे तपासात समोर आले. याआधी अटक केलेल्या संशयितांपैकी उन्नैसचा वसीम शेख याच्यासोबत संपर्क आला होता. त्याच्या मार्फत उन्नैस कय्युम शेखचा मोबाईल फॉरमॅट करून दिल्याचे एटीएसच्या तपासात समोर आले. त्याचप्रमाणे या संशयितांचा क्रिएटीव्ह माईड्स ग्रुप नावाचा व्हॉट्सअप ग्रुपही असल्याचे समोर आले. उन्नैसच्या मोबाइलमध्ये दोन ऑडीओ क्लीप आढळून आल्या असून त्यातील संभाषण आक्षेपार्ह असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे एटीएसच्या पथकाने उन्नैस पटेल याची सुरुवातीस चौकशी करीत पुरावे आढळल्यानंतर त्यास शुक्रवारी (दि.२१) अटक केली. त्याला शनिवारी (दि.२२) न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी युक्तीवाद करीत १४ दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. त्यात संशयित उन्नैस याने इतर संशयितांचा मोबाइल फाॅरमॅट कसा केला?, त्यात कोणता डाटा होता?, ही माहिती गोळा करण्यासाठी कोठडीची आवश्यकता असल्याचे सांगितले होते. त्यानुसार न्यायालयाने उन्नैस पटेल याला ४ नोव्हेंबर पर्यंत एटीएस कोठडी सुनावली होती.

Related Articles

Back to top button