जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑक्टोबर २०२२ । 2019 च्या शिक्षक पात्रता परीक्षेत गैरप्रकार केल्याच्या कारणावरून राज्यातील 7884 शिक्षकांना अपात्र घोषित करून त्यांची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली. त्या शिक्षकांचे ऑगस्ट 2022 पासून पगारही रोखून ठेवले आहेत. उच्च न्यायालयाने मात्र शासनाची ही कृती बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. हे प्रकरण गाजत असताना आता परीषदेने सन 2018 मधील टी.ई.टी.परीक्षेतही एक हजार 663 शिक्षकांची यादी जाहीर केली असून त्यांना ही गैव्यवहारप्रकरणी अपात्र घोषित केले मात्र ज्या शिक्षकाने ही परीक्षा दिली व तो नापास झाला त्याचेही नाव सादर यादीत आहे. नापास होण्यासाठीही गैव्यवहार करावा लागतो की काय? असा प्रश्न भुसावळातील शिक्षणतज्ज्ञ प्र.ह.दलाल यांनी उपस्थित केला आहे.
परीक्षा परीषदेचा कारभारच बोगस
जगात कोठेही नसलेला कारभार अजब गजब करून आम्ही काहीही करू शकतो हेच परीक्षा परीषदेने सिद्ध केले आहे. याचा दुसरा अर्थ परीक्षा परीरषदेचा कारभारच बोगस असून ती म्हणजे तेथील संबंधित अधिकारीही अपात्र आहेत मग यांचेही वेतन थांबविणार का? त्यांच्यावर अकार्यक्षम म्हणून त्यांचीही चौकशी करणार का? वेळोवेळी शिक्षकांवर कारवाईचा बडगा उचलणार्या परीषदेचा चमत्कारीक कारभार पाहून घोषित यादी कितपत यथार्थ मानावी अशीही शंका निर्माण होत आहे. परीक्षेत गैव्यवहार करणार्या शिक्षकांची जशी यादी जाहीर केली तशी यातील एजंट कोण आहेत? कुणाच्या माध्यमातून हा गैव्यवहार झालाय त्यांची यादी जाहीर करावी तसेच त्यांना रान मोकळे कसे?असा प्रश्न शिक्षकांचे ज्येष्ठ नेते तथा शिक्षणतज्ज्ञ प्र.ह.दलाल यांनी एका पत्रकाद्वारे उपस्थित केला आहे.